घरमहाराष्ट्ररायगडकर व्होट कर !

रायगडकर व्होट कर !

Subscribe

रुग्ण, दिव्यांगांसाठी विशेष मोहीम, राज्यात पहिलाच उपक्रम

रायगड जिल्ह्यात रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले रुग्ण आपल्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नयेत म्हणून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. असा उपक्रम राज्यात पहिल्यांदाच राबविण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग मतदारांसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. दिव्यांग (मूकबधीर) मतदारांसाठी सांकेतिक भाषेतील विशेष संदेशही सोशल मीडियावर पाठविण्यात आला आहे, अशी माहिती रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिली.

स्वीप कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. सूर्यवंशी बोलत होते. यावेळी स्वीप नोडल अधिकारी तथा जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने आदी उपस्थित होते. देशाच्या, राज्याच्या हितासाठी आणि विकासासाठी मतदानाचा हक्क तथा कर्तव्य बजावणे अत्यंत आवश्यक आहे. हा संदेश जनमानसात पोहचविण्यासाठी 19 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात वॉकेथॉन स्पर्धा आयोजित केली असून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘रायगडकर व्होट कर’ हे या वॉकथॉनचे घोषवाक्य असेल, असे डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

- Advertisement -

जिल्ह्यात आज अखेर 22 लाख 73 हजार 239 मतदारांची नोंद झाली आहे. त्यामध्ये 11 लाख 57 हजार 457 पुरुष मतदार, 11 लाख 15 हजार 777 महिला मतदार व इतर 5 चा समावेश आहे. जिल्ह्यात 16 हजार 901 दिव्यांग मतदार आहेत. मतदानासाठी 2 हजार 714 मतदान केंद्राची सोय करण्यात आली आहे.

निवडणुकीच्या कामासाठी तब्बल 12 हजार 697 अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये सात हजार 433 पुरुष आणि पाच हजार 264 महिलांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे एक हजार 905 वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. 41 भरारी पथकांची स्थापनाही केली आहे. 3013 मतदान युनिट आणि तेवढेच मतदान यंत्र, 345० व्हीव्हीपॅट यंत्र उपलब्ध झाले आहेत. सी व्हीजल अ‍ॅप वर केवळ 9 तक्रारी दाखल झाल्या होत्या. यापैकी 3 तक्रारींमध्ये काहीच तथ्य नव्हते. उर्वरित 6 तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात 59 हजार मतदारांनी अभिरूप मतदान केले आहे.

- Advertisement -

जास्त मतदान करण्यासाठी स्पर्धा

जिल्ह्यात आतापर्यंत स्वीप कार्यक्रमांतर्गत साडेतीन लाख संकल्प पत्रे भरुन घेण्यात आली आहेत. 271 पथनाट्ये सादर करण्यात आली असून 490 बॅनर्स लावण्यात आले आहेत. शाळा, महाविद्यालये, बचतगट, कामगार यांच्या मार्फत 236 मतदान जनजागृतीच्या रॅलीचे आयोजित करण्यात आले. ज्या कंपनीच्या कामगारांचे व त्यांच्या कुटूंबियाचे मतदानाचे प्रमाण जास्तीत जास्त असेल त्यांचा जिल्हा प्रशासनातर्फे सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे. अशी स्पर्धा वरिष्ठ महाविद्यालयातही घेतली जाणार असून त्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे मतदानाचे प्रमाण जास्त असेल त्या महाविद्यालयातील प्राचार्यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. बचत गटांच्या ग्रामसेवा संघातही ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. सर्व महाविद्यालयातील एन.एस.एस. चे सर्व विद्यार्थी मतदान जनजागृती मोहिमेत सहभागी झाले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 59 हजार लोकांनी अभिरुप मतदान केले आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -