घरमुंबईसकाळी राष्ट्रवादीचा प्रचार रात्री भाजपत प्रवेश

सकाळी राष्ट्रवादीचा प्रचार रात्री भाजपत प्रवेश

Subscribe

राजकारणात कधी कोण कोणत्या पक्षात जाईल हे सांगता येत नाही. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी पक्षांतरे केली. जागावाटप, उमेदवारी या सर्व बाबी पार पडून निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक झटका बसला आहे. सकाळी अजित पवार यांच्या सोबत प्रचार करणार्‍या माजी आमदाराने रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात सुनील टिंगरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली आहे. काल १४ ऑक्टोबर रोजी सकाळी सुनील टिंगरे यांच्या प्रचारार्थ माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत या मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे माजी आमदार बापूसाहेब पठारे हेदेखील उपस्थित होते. सुनील टिंगरे यांच्या प्रचारासाठी आयोजित रॅलीत ते सहभागी झाले होते. पण रॅलीनंतर १२ तासांतच बापूसाहेब पठारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला. वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून बापूसाहेब पठारे हे निवडणुकीसाठी इच्छुक होते. पण राष्ट्रवादीचे नगरसेवक सुनील टिंगरे यांना पक्षाने उमेदवारी दिली. त्यामुळे बापूसाहेब टिंगरे नाराज होते, अशी चर्चा रंगली आहे.

- Advertisement -

कार्यकर्ते म्हणाले, अन्याय झाला

भाजप प्रवेशाबाबत माजी आमदार बापूसाहेब पठारे म्हणाले की, मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रॅलीत सहभागी झालो. तेव्हा माझ्या कार्यकर्त्यांनी पक्षाने तुमच्यावर अन्याय केला म्हणून सांगितले. एवढेच नाही तर आता आम्ही पक्षाचे काम करणार नाही म्हणून कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केली. कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून मी विचार केला. प्रत्येक बैठकीत राष्ट्रवादीने मला डावलले. एवढेच नाही तर यंदा मला उमेदवारी नाकारली. त्यामुळे मी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. यापुढे मी भाजपचेच काम करणार.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -