घरमुंबईतिकीट का दिलं नाही, हे पक्षश्रेष्ठींना विचारेन - विनोद तावडे

तिकीट का दिलं नाही, हे पक्षश्रेष्ठींना विचारेन – विनोद तावडे

Subscribe

विनोद तावडेंनी 'तिकीट न मिळताही पक्षाच्या विजयासाठी काम करणार', असं विनोद तावडेंनी पत्रकार परिषद करून जाहीर केलं आहे.

विद्यमान आमदार आणि माजी मंत्री विनोद तावडे यांना भाजपने जाहीर केलेल्या ४ याद्यांपैकी एकाही यादीत नाव नसल्यामुळे विनोद तावडेंचं आता काय? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, अखेर अर्ज भरण्यासाठीच्या शेवटच्या दिवशी सकाळी विनोद तावडेंनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली. ‘तिकीट का मिळालं नाही? याची चर्चा मी पक्षश्रेष्ठींनी नक्कीच करेन. पण आत्ता नेशन फर्स्ट यानुसार पक्षाला दोन तृतीयांश मतांनी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार’, असं विनोद तावडेंनी जाहीर केलं आहे. त्यामुळे तिकीट न मिळाल्यामुळे तावडे नाराज होऊन पक्ष सोडण्याच्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला.

- Advertisement -

‘निवडणुका झाल्यानंतरच यावर चर्चा होईल’

‘माझ्या मंत्रीपदाच्या काळात तिकीट न देण्यासारखं काही घडलं नाही. त्यामुळे तसंच जर काही असेल, निवडणुका झाल्यानंतर पक्षश्रेष्ठींशी चर्चा करेन. जर माझं काही चुकलं असेल, तर पक्षश्रेष्ठी मला सांगतील आणि जर पक्षाचं काही चुकलं असेल, तर ते चूक सुधारतील’, असं विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. ‘मी संघाच्या आणि भाजपच्या मुशीत तयार झालो आहे. मी भाजपला सोडणं शक्यच नाही. तशा चर्चा केल्या गेल्या. आत्ता तरी माझ्यासाठी भाजपचा दोन तृतीयांश मतांनी जिंकून आणणं हेच माझं ध्येय आहे. निवडणुका झाल्यानंतर या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा होईल’, असं देखील ते म्हणाले.


हेही वाचा – भाजपचा कोटा संपला, सर्व १५० उमेदवारांची नावं जाहीर; वाचा पूर्ण यादी!

‘पक्ष जे सांगेल, ते करू’

‘माझ्या काही चुका असतील, तर त्या कुणीही सांगाव्यात. निवडणुकीच्या गडबडीत मुख्यमंत्र्यांशी, पक्षश्रेष्ठींशी नीटसं बोलता आलं नाही. पण निवडणुकीनंतर त्यासंदर्भात नक्कीच कळेल. तिकीट किंवा उमेदवारी नसताना पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत राहीन. एकनाथ खडसे, बावनकुळे, प्रकाश मेहता यांच्यावर अन्याय झाला की नाही यासंदर्भात प्रत्येकाची केस वेगळी आहे. पण आम्हाला पक्ष जे सांगेल, ते करू’, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

एक प्रतिक्रिया

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -