घरमहाराष्ट्रटिकटॉकवर राजकीय जाहिरातींना बंदी; कंपनीचं परिपत्रक जारी

टिकटॉकवर राजकीय जाहिरातींना बंदी; कंपनीचं परिपत्रक जारी

Subscribe

टिकटॉकवर राजकीय जाहिरातींना बंदी घालण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया कॅम्पेनर्ससाठी ही निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो.

फेसबुक, ट्वीटर, इन्स्टाग्राम याहून अधिक वेगाने लोकप्रिय ठरणाऱ्या टिकटॉक या अॅप्लिकेशनने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर राजकीय जाहिरातींना बंदी घातली आहे. वर नमूद केलेल्या तिनही सोशल मीडिया साईट्सवर राजकीय जाहिरातबाजी मोठ्या प्रमाणावर होत आहे. या पार्श्वभूमीवर या साईट्सला मोठ्या टिकेचा सामना करावा लागत असतानाच टिकटॉकने हा निर्णय घेतल्यामुळे त्यांनी रोग होण्याआधीच इलाज केल्याचं बोललं जात आहे. कंपनीच्या बीजिंग येथील मुख्यालयातून राजकीय जाहिरातबाजीवर बंदी आणण्यात आल्यासंदर्भातील परिपत्रक काढण्यात आलं आहे. ‘राजकीय जाहिरातींचं स्वरूप आमच्या धोरणात बसत नाही’, असं या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

कोणत्या जाहिरातींवर बंदी?

टिकटॉकने काढलेल्या पत्रकामध्ये कोणत्या प्रकारच्या राजकीय जाहिरातींवर बंदी आहे ते नमूद केलं आहे. यामध्ये पेड जाहिराती, एखाद्या उमेदवाराला विरोध करणाऱ्या किंवा त्याचा पुरस्कार करणाऱ्या जाहिराती, विद्यमान नेत्याच्या जाहिराती, राजकीय पक्ष किंवा गटांच्या जाहिराती, कोणत्याही राजकीय, राष्ट्रीय किंवा स्थानिक पातळीवरील समस्या यासंदर्भातल्या जाहिरातींचा समावेश आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘टिकटॉक’च्या विराट कोहलीची बॉलिवूड एण्ट्री!

का घातली बंदी?

टिकटॉककडून यावर अधिक प्रकाश टाकण्यात आला नसला, तरी असा राजकीय जाहिरातींची खातरजमा आणि सत्यासत्यता पडताळण्यासाठीची यंत्रणा उपलब्ध नसणे हे यामागील एक कारण सांगितलं जात आहे. फेसबुककडे अशा प्रकारची यंत्रणा असून त्यांच्याकडून जाहिरातींचं नियमन केलं जातं. दरम्यान, महाराष्ट्र आणि हरयाणा या राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर टिकटॉकने राजकीय जाहिरातबाजीसंदर्भात जाहीर केलेल्या या भूमिकेमुळे त्याचा काही प्रमाणात फटका निवडणुकांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -