Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Live Update: मिग-२१ विमानं राजस्थानात कोसळलं, पायलट सुखरुप

Live Update: मिग-२१ विमानं राजस्थानात कोसळलं, पायलट सुखरुप

Related Story

- Advertisement -

भारतीय एअर फोर्सचे एक मिग-२१ जेट तांत्रिक कारणामुळे कोसळ्याचे झाल्याचे समोर आले आहे. आज संध्याकाळी राजस्थानच्या सूरतगढमध्ये ही दुर्घटना घडली असून यामधील पायलट सुरक्षित आहे. या दुर्घटनेसंदर्भात अधिक तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


- Advertisement -

 

मागील २४ तासांत मुंबईत ३७९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख ९५ हजार ५२४वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ११ हजार १४७ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच मागील २४ तासांत मुंबईत ३७९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत २ लाख ७६ हजार ४१३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -


राज्यात गेल्या २४ तासांत ३ हजार १६० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून २ हजार ८२८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच ६४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील सध्या कोरोनाबाधितांची संख्या १९ लाख ५० हजार १७१वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४९ हजार ७५९ रुग्णांचा मृत्यू झाला असून १८ लाख ५० हजार १८९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ४९ हजार ६७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


नव्या संसदेच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने हा मोठा निर्णय दिला आहे. त्यामुळे आता संसदेच्या नव्या इमारतीच्या बांधकामाला सुरूवात होणार आहे.  पंतप्रधानांच्या ड्रिम प्रोजेक्टचा मार्ग मोकळा झाला आहे.

- Advertisement -