जो बायडेन यांना कंगना रनौत म्हणाली ‘गजनी’

Kangana Ranaut compares Joe Biden to Aamir Khan's character from 'Ghajini'
जो बायडेन यांना कंगना रनौत म्हणाली 'गजनी'

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीसंदर्भात संपूर्ण जगभरात चर्चा सुरू आहे. अमेरिकेला नवे राष्ट्राध्यक्ष मिळाले आहेत. डेमोक्रॅटिक पार्टीचे उमेदवार जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारली आहे. त्यामुळे राजकारण्यांपासून बॉलिवूडचे सेलिब्रिटी देखील जो बायडेन यांना शुभेच्छा देत आहेत. दरम्यान प्रत्येक मुद्द्यांवर आपले मतं व्यक्त करणारी आणि चर्चेत येणारी अभिनेत्री कंगना रनौतने जो बायडेन यांना देखील सोडले नाही आहे. तिने खुलेपणाने आपलं मत व्यक्त केलं आहे. तिने ट्विटरच्या माध्यमातून बायडेन यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच कमला हॅरिस यांचा विजय म्हणजेच महिलांचा विजय असल्याचे कंगना म्हणाली आहे.

नक्की काय म्हणाली कंगना?

कंगनाने ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘गजनी’ बायडेन यांच्याबाबत मी निश्चित नाही आहे. ज्यांचा डेटा दर ५ मिनिटांत क्रॅश होता, एवढ्या साऱ्या औषधांचे इंजेक्शन्स जे त्यामध्ये इंजेक्ट केले गेले आहे, तर ते एका वर्षापेक्षा अधिक काळ टिकणार नाही, कमला हॅरिसच हा शो पुढे चालवेल. जेव्हा एक महिला उठते तेव्हा ती इतर महिलांसाठीही मार्ग तयार करते. या ऐतिहासिक दिवसांसाठी चिअर्स.’

कंगना थेट जो बायडेन यांच्या स्मृती किंवा बुद्धी विषयी म्हणाली आहे. तिने ‘गजनी’ चित्रपटातील आमीर खान सारखी बायडेन यांची स्मरणशक्ती असल्याचे ती म्हणाली आहे. तिच्या या ट्विटवरून स्पष्ट झाले आहे की, ‘कंगना जो बायडेन यांच्या विजयामुळे नाहीतर कमला हॅरिस यांच्या विजयामुळे खुश आहे. याला महिलांचा विजय म्हटले आहे.’

५६ वर्षीय कॅलिफोर्नियाच्या सीनेटर कमला हॅरिस तीन आशियाई अमेरिकत सीनटर्सपैकी एक आहे. या चेंबरमध्ये येणारी ही पहिली भारतीय अमेरिकन सिनेटर आहे.


हेही वाचा – जो बायडेन डोनाल्ड ट्रम्प यांच्या मतदारांना म्हणाले की, ‘आता एकमेकांना संधी देऊ’