लस आली तरी लसीकरण अवघड; २५ कोटी डोस द्यावे लागणार – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोनाची लस येणार असे बोलले जाते. मात्र लस नक्की कधी येणार? हे माहीत नाही. तसेच लस आल्यानंतर ती कशी द्यायची, हे देखील ठरलेले नाही. सर्वांना एकत्रित लस देणे अवघड आहे. सर्वांना एकत्रित लस देता येणार नाही. कारण
राज्याची लोकसंख्या १२ कोटी आहे. जी लस येईल ती १२ कोटी जनतेला दिल्यानंतर त्याचा पुन्हा एक बुस्टर डोस द्यावा लागणार आहे. म्हणजेच राज्यासाठी २५ कोटी लसींची गरज लागणार आहे. एवढ्या प्रमाणात लसीकरण हे लवकर होणार नाही. त्यामुळे जनतेने कोरोनापासून बचाव करण्याचे जे मार्ग आहेत, त्याचा काटेकोरपणे अवलंब करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.