अहमदनगर : एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

अहमदनगरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Ahmednagar
akola city maharashra boxer pranav raut suicide in hostel room
सुवर्णपदक विजेत्या बॉक्सरची आत्महत्या

अहमदनगरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदनगरमधील पारनेर तालुक्यातील गुणोरे या गावातील बढे ढवळे वस्तीवर राहणारे बाबाजी विठ्ठल बढे (४०), कविता बाबाजी बढे (३५), आदित्य बाबाजी बढे (१५) आणि धनंजय बाबाजी बढे (१३) या एकाच कुटुंबातील चार जणांनी घरातील लोखंडी पाईपला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या का केली याचे कारण मात्र, अद्याप स्पष्ट झालेले नाही.

जनावरांच्या हंबरण्याने घटना उघडकीस आली

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे या परिसरातून ग्रामस्थ जात असचताना बाबाजी बढे यांच्या गोठ्यातील जनावरे हंबरत होते. ही जनावर का हंबरत आहेत म्हणून ग्रामस्थ पाहिले असता घराचे दार खिडकी बंद होती. नेहमी सकाळी लवकर उठणारे बढे आज का उठले नाही म्हणून त्यांनी घराची खिडकी उघडली असता हा प्रकार समोर आला आहे. बाबाजी विठ्ठल बढे यांची सहा एकर शेती आणि पशुपालन करुन कुटुंब चालवत होते, अशी माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.


हेही वाचा – शाळेच्या इमारतीवरून उडी मारुन विद्यार्थीनीची आत्महत्या