घरताज्या घडामोडीकरोना व्हायरसविरोधात रेल्वे प्रशासन सज्ज; युद्धपातळीवर जनजागृती सुरु

करोना व्हायरसविरोधात रेल्वे प्रशासन सज्ज; युद्धपातळीवर जनजागृती सुरु

Subscribe

प्रवाशांमध्ये करोना व्हायरस पसरु नये, यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे.

चीनमधून जगभरात पसरत असलेल्या करोना व्हायरस आता राज्यात दाखल झाला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विमान तळावर येणार्‍या प्रवाशांची तपासणी आणि विमानात काम करण्यार्‍या कर्मचार्‍या काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र विमानापेक्षा रेल्वेतून मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक होते. त्यामुळे करोना व्हायरसचा मोठा धोका रेल्वेला असून यांच्या धसका सुध्दा रेल्वेने घेतला आहे. करोना व्हायरस पसरु नयेत, यासाठी रेल्वे प्रशासनाने सर्व तयारी सुरू केली आहे. रेल्वे डॉक्टर, रेल्वे कर्मचारी आणि विशेषता रेल्वे डब्यात काम करणार्‍या कर्मचार्‍या विशेष ट्रेनिंग देण्यात आले आहे. तसेच रेल्वे मार्गांवरील रूग्णालयांची नोंदणी सुध्दा रेल्वे प्रशासनाने केली आहे. इतकेच नव्हेतर रेल्वे डब्यात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे.

भारतील वाहतूक व्यस्थेतील सगळ्यात मोठे जाळे भारतीय रेल्वेचे आहे. भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे सेवापैकी एक आहे. भारतीय रेल्वेत दररोज १ कोटी ६० लाख पेक्षा जास्त प्रवास करतात. एका राज्यातून दुसर्‍या राज्यात जाण्यासाठी एक महत्वपूर्ण भूमिका ही भारतीय रेल्वे आज बजावत आहे. मात्र रेल्वे प्रवाशांची यात्रा सुखकर आणि सुरक्षित मंगलमय होण्याच्या शुभेच्छा देणार्‍या रेल्वेला आता करोना व्हायरसमुळे डोके दुखी वाढली आहे. इतकेच नव्हेतर मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गाचे मुख्यालय मुंबईत असल्यामुळे इतर राज्यातून येणार्‍या प्रवाशांची संख्या फार मोठी आहे. त्यातच मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील दैनंदिन उपनगरीय प्रवाशांची संख्या ७५ लाख आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने करोना व्हायरस पसरु नयेत, यासाठी युध्दपातळीवर जनजागृती करणे सुरु केले आहे. रेल्वे स्थानकात, रेल्वे परिसरात कोरोना व्हायरसविषयी जनजागृती करणारे सूचना फलक, स्थानिक भाषेत प्रदर्शित करण्यात येत आहे, तसेच छोटे-छोटे जनजागृती व्हिडिओ तयार करण्यात आले आहे. करोना व्हायरस संबंधीत रेल्वे गाडयात उद् घोषणा सुध्दा देण्यात येत आहे. याशिवाय रेल्वे रूग्णालय मदतीसाठी २४ तास सुरु असणार आहेत. त्यासाठी हेल्पलाईन क्रमांकही सूरु केल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहेत.

- Advertisement -

करोना रुग्णासाठी रेल्वेकडून विशेष कक्ष

रेल्वे कर्मचार्‍यांना जर कर्तव्यावर असताना करोना व्हायरस झाला. किंवा त्यांचे लक्षण दिसून आले. तर लगेच रेल्वे रूग्णालयामध्ये तपासणी करावी. रेल्वे प्रशासनाने करोना रुग्णांसाठी विशेष कक्ष तयार करण्यात आला आहेत. त्याचबरोबर या कक्षात करोना व्हायरस संबंधीत तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रेल्वे डॉक्टरांना विशेष प्रशिक्षण

केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यावतीने रेल्वे रुग्णालयातील डॉक्टरांना आणि मेडिकल स्टॉफला विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये करोना व्हायरलबद्दल रुग्णाची कशी काळजी घ्यावी, याची माहिती देण्यात येईल. रेल्वे विभागात कोणालाही करोनाची बाधा असल्यास याची माहिती तत्काळ अधिकार्‍यांना देण्यात यावी, अशा सूचना रेल्वे मंडळाकडून प्रत्येक रेल्वे विभागाला देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

रेल्वे कर्मचार्‍यांनाही धडे

प्रवासादरम्यान एखादा प्रवासी करोना व्हायरसचा आढळला तर काय उपायोजना करायच्या. यासाठी रेल्वे कर्मचार्‍यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. ज्यामध्ये या व्हायरसपासून दूर राहण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, याची माहिती मिळेल. त्यांना रूग्णालयापर्यंत कसे पोहोचायचे यासर्व गोष्टींचे प्रशिक्षण रेल्वे डब्यात काम करण्यार्‍या कर्मचार्‍यांना देण्यात आले आहे.

रेल्वे स्थानकावर रूग्णालयाची माहिती

करोनाबाधित रुग्ण रेल्वे प्रवासादरम्यान आढळल्यास त्याला रुग्णालयात पोहचविण्यासाठी रेल्वे स्थानकांचा जवळ असलेल्या शासकीय रुग्णालय आणि रेल्वे रुग्णालयाची पुर्ण माहिती रेल्वे डब्यात काम करण्यार्‍या रेल्वे कर्मचार्‍यांना देण्यात आली आहे. इतकेच नव्हेतर रुग्णालयात असलेल्या डॉक्टरांची मोबाईल क्रमांक सुध्दा रेल्वे स्टेशन मास्तर आणि रेल्वे डब्यात काम करण्यार्‍या रेल्वे कर्मचार्‍यांना देण्यात आले आहे.

रेल्वेने प्रशासनाने दिले स्वच्छतेचे आदेश

रेल्वे प्रशासनाने रेल्वेचा प्रत्येक विभाग, उपविभाग आणि रुग्णालयात स्वच्छता राखण्याचे आदेश दिले आहेत. करोनापासून बचाव करण्यासाठी औषध फवारणी, धूर फवारणीचे सुध्दा आदेश देण्यात आले. ज्या व्यक्तीला ताप आला असल्यास त्याला तत्काळ योग्य उपचार देण्यासाठी प्रयत्न करा. त्याच्यावर तातडीने उपचार होणे आवश्यक आहे, असेही आदेश रेल्वे प्रशासनाने दिले आहेत.

सोशल मीडियाचा वापर

करोना व्हायरस संबंधीत रेल्वे प्रशासानाकडून नेहमीच सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहेत. रेल्वे प्रवाशांचा तक्रारीचे ट्विट नेहमीच निराकरण करण्यात होत असते. यात करोना व्हायरस संबंधीत प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. त्यासंबंधी रेल्वेने आपल्या सोशल मीडिया विभागात तसे निर्देश सुध्दा दिले आहे. रेल्वेकडून सोशल मीडियावर बारकीईने नजर ठेवण्यात येत आहे.

रेल्वे मंडळाने दिलेल्या आदेशाचे पुर्णपणे पालन करुन आम्ही करोना व्हायरस पसरु नये, यासाठी पुर्ण सज्ज आहोत. इतकेच नव्हेतर रेल्वे प्रवाशांना करोना व्हायरस संबंधी जनजागृती करण्यावर भर देत आहे. यासाठी युद्धपातळीवर रेल्वे कर्मचारी आणि रेल्वे डॉक्टर काम करत आहे. रेल्वे प्रवासात मास्क घालून प्रवाशांनी प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
– शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -