Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र विठ्ठल मंदिराने २ वर्ष ऑडिट केलेच नाही; भाविकांच्या जीवाशी खेळ

विठ्ठल मंदिराने २ वर्ष ऑडिट केलेच नाही; भाविकांच्या जीवाशी खेळ

लाखो वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल मंदिराचे गेल्या दोन वर्षांपासून फायर ऑडिटच केले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

Related Story

- Advertisement -

भंडार्‍यातील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व खासगी आणि सरकारी रुग्णालयाचे ऑडिट करण्याचे आदेश दिले. दरम्यान, एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. लाखो वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल मंदिराचे गेल्या दोन वर्षांपासून फायर ऑडिटच केले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या मंदिरात सव्वा ते दीड कोटी भाविकांची ये-जा असते. त्यातच वास्तूमध्ये वातानुकूलित यंत्रणा, अस्ताव्यस्त वायरिंग यामुळे मंदिराला आगीचा धोका संभवू शकतो. विशेष म्हणजे मंदिरात देवाचे किचन देखील असल्याने दरवर्षी मंदिराचे फायर ऑडिट करुन त्रुटी दूर करणे अत्यंत महत्त्वाचे असायला हवे होते. मात्र, २०१८ नंतर मंदिराने फायर ऑडिट करुन न घेतल्याचे समोर आले आहे.

मागील काही दिवसांपासून शॉर्ट सर्किटमुळे अनेक आगीच्या दुर्घटना सातत्याने घडत आहेत. त्यातच विठ्ठल मंदिरात सध्या असलेले वायरिंग अतिशय धोकादायक असल्याचे समोर आले आहे. त्यातच हे वायरिंग विठ्ठल सभामंडपाच्याकडेनेच नेण्यात आले असून त्याच्या शेजारुन दर्शनाची रांग मंदिराच्या छतावरुन जात असते. याशिवाय मंदिराला लागून असलेला सात मजली दर्शन मंडप अतिशय चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आला आहे. तर विठ्ठल मंदिराचा DPR पुरातत्व विभागाच्या सल्ल्याने बनवून घेण्याचे काम सध्या सुरु आहे. काही दिवसांपूर्वी इन्फ्रा रेड कॅमेराने मंदिराच्या वस्तूची तपासणीही करण्यात आली आहे.

- Advertisement -

विठ्ठल मंदिराची मूळ वास्तू अकराव्या शतकातील असून अशी पुरातन आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या तीर्थक्षेत्राबाबत गांभीर्याने काळजी घेणे गरजेचे असताना मंदिराने गेल्या दोन वर्षांपासून फायर ऑडिट न करणे हा खूप गंभीर प्रकार आहे.


हेही वाचा – भंडारा दुर्घटना: चौकशीतून सत्य बाहेर येईल – मुख्यमंत्री


- Advertisement -

 

- Advertisement -