घरक्रीडाशानदार समारंभात हर्षवर्धनचा नाशिककरांच्या वतीने सत्कार

शानदार समारंभात हर्षवर्धनचा नाशिककरांच्या वतीने सत्कार

Subscribe

महापालिकेच्या वतीने दिले ३ लाख रुपये, चांदीची गदा अन् मानपत्र; महापौरांनी उधळली स्तुती सुमने

नाशिकला ६३ वर्षानंतर महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवून देणार्‍या हर्षवर्धन सदगीरचा शानदार नागरी सत्कार महापालिकेच्या वतीने महाकवी कालिदास कलामंदिरात मंगळवारी (दि.२८) करण्यात आला. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते हर्षवर्धनला ३ लाख रुपये रोख, चांदीची गदा आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

काही दिवसांपूर्वीच सदगीरच्या अभिनंदनाचा प्रस्ताव महासभेत सादर करण्यात आला होता. त्यानुसार कालिदास कलामंदिरात सत्काराचा कार्यक्रम झाला. व्यासपीठावर उपमहापौर भिकुबाई बागुल, आयुक्त राधाकृष्ण गमे, स्थायी समिती सभापती उद्धव निमसे, सभागृह नेते सतीश सोनवणे, विरोधी पक्ष नेता अजय बोरस्ते, काँग्रेसचे गटनेते शाही खैरे, राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार, शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे, रिपाइंचे गटनेते दीक्षा लोंढे, मनसेचे गटनेत्या नंदीनी बोडके, नगरसेवक दिनकर पाटील, सलिम शेख, अशोक मुर्तडक, गजानन शेलार, स्वाती भामरे आदी उपस्थित होते. हर्षवर्धनने नाशिकच्या लौकीकात भर घातल्याचे गौरवोदगार काढत महापौरांनी हर्षवर्धनवर स्तुतीसुमने उधळली. क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी महापालिकेच्या वतीने नेहमीच प्रयत्न करता येतात. यापुढील काळातही खेळाडू घडविण्यासाठी महापालिकेचा सहभाग मोठा असेल असे ते म्हणाले. यावेळी मानपत्राचे वाचन करण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात हर्षवर्धनचे स्वागत करण्यात आले. मल्लखांब, धर्नुविद्या, जिमनॅस्टिक आदी खेळांचे प्रात्यक्षिकही यावेळी करण्यात आले. यावेळी विविध तालिम संघांतील पहिलवानांसह नाशिककरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -