सध्या बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खान सौदी फिल्म इंडस्ट्रीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सौदी अरेबियाच्या रियादमध्ये आहे. जेथे आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी आणि चित्रपट निर्माते देखील सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमातील एक फोटो शहारूखने सोशल मीडियावर शेअर केले आहे. ज्यात शाहरुखबरोबर जॅकी चॅन, जीन क्लाउड वान डॅम शिवाय एक्वामॅन सन मोमोआ देखील दिसताय.
शाहरुख खानने इन्स्टावर हा फोटो शेअर करताना असे कॅप्शन दिले आहे,’ Khan, Damme, Chan at the #JoyForum19. The joys all mine as I got to meet my heroes..’ या फोटोतील जीन क्लाउड वान डॅम एक प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक असून त्यांनी किक बॉक्सर, द क्वेस्ट अॅन्ड किल म ऑल यासारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. हाँगकाँगचा जॅकी चॅन आंतरराष्ट्रीय अभिनेता, निर्माता, स्टंट कलाकार आणि अॅक्शन कोरिओग्राफर म्हणून ओळखला जातो. त्याने १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा शाहरुख खानचा हा सेल्फी बॉलिवूड कलाकारांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. या फोटोवर टायगर श्रॉफने ‘एक ही फ्रेम में सभी स्टार्स’ अशी कमेंट दिली तर रणवीर सिंगने ‘legends’ अशी कंमेट दिली आहे.
बॉलिवूडमधील शाहरुख खान हा एक नावाजलेला अभिनेता आहे यात शंका नाही. तसेच केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही त्याचे अनेक चाहते आहेत. जॉय फोरम या दोन दिवसीय महोत्सवात अंतरराष्ट्रीय व्यक्तींसह अनेक चित्रपट निर्माते देखील हजर असतील यावेळी किंग खान देखील तेथे उपस्थित राहणार आहे.