- Advertisement -
एमआयएम पक्षाचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील आणि औरंगाबाद मध्य मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कदीर मौलाना यांच्यात आज मतदान बुथ केंद्रावर हाणामारी झाल्याची घटना घडली. कटकट गेट नामक भागात ही हाणामारी झाली असून येथे तणावाचे वातावरण पसरले आहे. एमआयएमचे अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या विरोधात आंदोलनासाठी बसले आहेत. पोलिसांनी या भागात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या सोशल मीडियावर इम्तियाज जलील यांना धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
- Advertisement -