भारतीय क्रिकेटसाठी पुढील वर्षाची सुरूवात ही न्यूझीलंडमध्ये होणार आहे. भारताचा संघ २३ जानेवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. भारताच्या या दौऱ्यात ५ एकदिवसीय तर ३ टी-२० सामन्यांचा समावेश असणार आहे. न्यूझीलंड क्रिकेटने आपल्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवरून भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याचे वेळापत्रक जाहिर केले आहे.
असा असेल भारताचा न्यूझीलंड दौरा
२०१९ च्या सुरूवातीलाच भारताचा संघ न्यूझीलंड दौऱ्यासाठी रवाना होणार असून न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू मिशेल सॅन्टनर याने न्यूझीलंड क्रिकेटच्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवरून एका व्हिडिओद्वारे भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
Mitchell Santner is on the mend recovering from injury and he has a message for fans ahead of the home summer! ??????? | https://t.co/RsdZyz8o17 #CricketNation pic.twitter.com/PC5UkDhkr1
— BLACKCAPS (@BLACKCAPS) July 31, 2018
भारतविरूद्ध न्यूझीलंड पाच एकदिवसीय सामने –
- पहिला एकदिवसीय सामना – २३ जानेवारी २०१९
- दुसरा एकदिवसीय सामना – २६ जानेवारी २०१९
- तिसरा एकदिवसीय सामना – २८ जानेवारी २०१९
- चौथा एकदिवसीय सामना – ३१ जानेवारी २०१९
- पाचवा एकदिवसीय सामना – ३ फेब्रुवारी २०१९
भारतविरूद्ध न्यूझीलंड तीन टी-२० सामने –
- पहिली टी-२० सामना : ६ फेब्रुवारी २०१९
- दुसरी टी-२० सामना : ८ फेब्रुवारी २०१९
- तिसरी टी-२० सामना : १० फेब्रुवारी २०१९