बॉलिवूड(bollywood)अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty)पति राज कुंद्राला(Raj Kundra) 19 जुलै रोजी मुंबई गुन्हेगारी शाखेच्या पथकाने पॉर्नोग्राफी चित्रपट निर्मीती आणि वितरण केल्या प्रकरणी अटक केली होती. गेल्या दोन महिन्यापासून राज कुंद्रा तुरूंगात कैद असून काल त्याला जामिन देण्यात आला आहे. यानंतर राजची पत्नी शिल्पा शेट्टीने पोस्ट करत आनंद व्यक्त केला आहे.(Shilpa Shetty shares post after bail to husband Raj Kundra)
शिल्पाने तिच्या अधीकृत इस्टाग्राम अकांऊटवर स्टोरी शेअकर करत एक संदेश लिहला आहे. संध्याकाळी स्वच्छा आकाशात दिसत असलेल्या एका सुंदर इंद्रधनुष्याचा फोटो पोस्ट करत त्याला एका लेखकाने लिहलेलं वाक्य कोट करुन फोटो पोस्ट आहे. “इंद्रधनुष्यचे अस्तित्व हे सांगण्यासाठी आहे की एका वाईट वादळानंतर देखील अनेक सुंदर गोष्टी घडतात” शिल्पाचे हे वाक्य तिच्या सध्याच्या परिस्थीतिवर भाष्य करत आहे. राज कुंद्राच्या जमिनानंतर शिल्पाच्या आनंदाला पारावरच उरला नाही.
पोस्ट पाहा-
माहितीनुसार राज कुंद्रा विरोधात 1500 पानांची चार्टशीट तयार करण्यात आली असून 43 साक्षीदारांचे नाव यात नोंदवण्यात आले आहे. दोन महिन्यांपासून पोलिस राजची कसून चौकशी करत असून सध्या राज जामीनावर बाहेर आला आहे.
२०२१ मध्ये मुंबई क्राईम ब्रांचने फेब्रुवारी महिन्यात पोर्नोग्राफी प्रकरण समोर आले आहे. तेव्हापासून राज कुंद्रा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. दरम्यान पोर्नोग्राफी प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत आहेत. यात एप्रिल महिन्य़ात ९ जणांविरोधात चार्जशीट दाखल करण्यात आली होती. मुंबई क्राईम ब्रान्चला गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मड भागातील एका बंगल्यात धाड टाकली.
हे हि वाचा – आलियाने ‘कन्यादान’ प्रथेवर केले भाष्य, हिंदू संस्कृतीचा अपमान केल्याने नेटकरी संतापले