घरमनोरंजनआलियाने 'कन्यादान' प्रथेवर केले भाष्य, हिंदू संस्कृतीचा अपमान केल्याने नेटकरी संतापले

आलियाने ‘कन्यादान’ प्रथेवर केले भाष्य, हिंदू संस्कृतीचा अपमान केल्याने नेटकरी संतापले

Subscribe

आलियाने हिंदू धर्माचा अपमान केल्याची टीका नेटकऱ्यांनी केली आहे. तसेच हे ब्रँन्ड तिहेरी तलाक सारख्या प्रथेवर भाष्य का करत नाही. हिंदू प्रथा, परंपरेलाच लक्ष का करतात?,

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt)नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नुकतच आलियाने मान्यवर(manyvar) या प्रसिद्ध कपड्यांच्या जाहिरातीमध्ये झळकली होती. सध्या सोशल मीडियावर(Social Media) या जाहिरातीला नेटकरी प्रचंड विरोध करताना दिसत आहे. या जाहिरातीमध्ये आलिया भारतीय संस्कृतीत लग्नसोहळ्या दरम्यान होणाऱ्या कन्यादान या प्रथेविषयी भाष्य करत आहे. मात्र यामुळे आलियाला चांगलच ट्रोल केल जात आहे. हिंदू धर्माचा अपमान केल्याबद्दल आलिया आता ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.(Alia Bhatt kanyadaan creates controversy)

आलियाची ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होत असून या जाहिरातीमध्ये आलिया नववधूच्या पेहरावात लग्न मंडपात दिसत आहे. यावेळी संभाषणा दरम्यान आलिया बोलते की, तिच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती तिच्यावर खूप प्रेम करतात. मात्र मुलीला परक्या घराचे धन का मानले जाते?, मुलगी ही दान करण्याची गोष्ट नाही. यामुळे मला हे कन्यादान अमान्य आहे. कन्यादान नाही कन्यामान करा असा संदेश आलिया व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न करत आहे. मोहे फॅशन यांनी त्यांच्या अधीकृत सोशल मीडिया अकांऊटवरुन हा व्हिडिओ शेअर केला असून त्याच्या कॅप्शनमध्ये लिहले आहे की, कन्यामान, नवे विचार, नवी कल्पना, का परक्याचे धन, का कन्यादान.मोहेची नवी कल्पना कन्यामान. आधुनिक वळणासह आजच्या नववधूंचा उत्सव साजरा करुया.

व्हिडिओ पाहा- 

 

View this post on Instagram

 

A post shared by Mohey (@moheyfashion)

- Advertisement -

आलिया भट्टचा हा व्हिडिओ आत्तापर्यंत अनेक लोकांनी पाहिला तिचे कौतुक देखील झाले. मात्र यासह अनेकांना तिची ही कल्पना फारसी रुचली नाही. आलियाने हिंदू धर्माचा अपमान केल्याची टीका नेटकऱ्यांनी केली आहे. तसेच हे ब्रँन्ड तिहेरी तलाक सारख्या प्रथेवर भाष्य का करत नाही. हिंदू प्रथा, परंपरेलाच लक्ष का करतात?,असा सवाल उपस्थित करत आलियाच्या जाहिरातीला बंद करा असे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

हे हि वाचा – अभिनेत्री पायल घोषवर ॲसिड हल्ल्याचा प्रयत्न

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -