घरटेक-वेकई- स्कूटरची बॅटरी ठरतेय चालकाच्या मृत्यूचे कारण; भारतात ई-स्कूटर वादाच्या भोवऱ्यात

ई- स्कूटरची बॅटरी ठरतेय चालकाच्या मृत्यूचे कारण; भारतात ई-स्कूटर वादाच्या भोवऱ्यात

Subscribe

भारतात गेल्या एका महिन्यात ई-स्कूटर्सना आग लागल्याच्या 7 हून अधिक घटना घडल्या. या घटनांमुळे आता ई-स्कूटर्सच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. देशातील अनेक स्टार्टअप्स त्यांच्या ई-स्कूटर बाजारात विकत आहेत. याच ई-स्कूटरच्या बॅटरी स्फोटामुळे आंध्रप्रदेशात 23 एप्रिल एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

ई-स्कूटरला आग लागण्याचा घटना सातत्याने वाढ असल्याने ग्राहकांच्या मनात अनेक शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. आग लागण्याची घटना केवळ एकाच कंपनीच्या स्कूटर बाबतीत घडली नाही तर ओला, ओकिनावा, बूम मोटर्स, जितेंद्र इलेक्ट्रि आणि प्युअर कंपन्यांच्या ई-स्कूटरमध्येही या घटना घडल्या आहे. यामुळे ओला आणि ओकिनावासारख्या कंपन्यांनी त्यांच्या ई-स्कूटर्स परत मागवल्या आहेत.

- Advertisement -

या घटनांची आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गंभीर दखल घेतली आहे. नितीन गडकरी यांनी ट्विट करून यासंबंधी चिंता व्यक्त केली आहे. तसेच ईव्ही कंपन्यांना कडक इशारा दिला की, ज्या डिफॉल्ट ईव्ही कंपन्या आहेत. त्यांच्यावर दंड या सोबत मोठी कारवाई केली जावू शकते

नेमक्या ई-स्कूटरला आग लागण्याच्या घटना कुठे घडल्या जाणून घेऊ,

- Advertisement -

१) पहिली घटना तामिळनाडूच्या वेल्लोर जिल्ह्यात 25 मार्च रोजी घडली. ओकिनावा कंपनीच्या ई-स्कूटरची बॅटरी रात्री चार्ज होत असताना स्फोट झाला आणि 45 वर्षीय पुरुष आणि 13 वर्षीय मुलीचा गुदमरून मृत्यू झाला.

२) दुसरी घटना 26 मार्चला पुण्यात घडली. ओलाच्या s1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटरला अचानक आग लागली.

३) तिसरी घटना 28 मार्च रोजी तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील मानापराई येथे घडली. या घटनेत ओकिनावा ई-स्कूटरला आग लागली.

४) चौथी घटना 30 मार्चला तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे घडली, जिथे हैदराबाद-आधारित स्टार्टअप प्युअरच्या ई-स्कूटरला आग लागली.

५) पाचवी घटना 9 एप्रिल रोजी नाशिकमधील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर इलेक्ट्रिक स्कूटर घेऊन जाणाऱ्या कंटेनर ट्रकला आग लागली. त्यामुळे त्यात ठेवलेल्या 20 इलेक्ट्रिक स्कूटर जळून खाक झाल्या.

६) सहावी घटना तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यातील २० एप्रिलची आहे. यावेळी इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागून एका 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आणि कुटुंबातील इतर चार सदस्य गंभीर भाजले.

७) सातवी घटना 23 एप्रिल रोजी आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे घडली. बूम मोटर्सकडून इलेक्ट्रिकमधून घेतलेल्या स्कूटरच्या बॅटरीचा चार्जिंगदरम्यान अचानक स्फोट झाला. या अपघातात गंभीर भाजल्याने आणि गुदमरून एकाचा पुरुषाचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी आणि मुले गंभीर जखमी झाली आहेत.

कंपन्यांनी यावर काय निर्णय घेतला?

आगीच्या घटनानंतर अनेक ई-स्कूटर कंपन्यांनी त्यांचे अनेक मॉडेल्स परत मागवले आहेत. यात ओकिनावा कंपनीने 3125, ओला इलेक्ट्रिकने 1441, Pure EV कंपनीने त्यांच्या eTrans Plus आणि ePluto 7G मॉडेलच्या 2,000 स्कूटर परत मागवल्या होत्या.

ई-स्कूटरच्या आगीच्या घटना रोखण्यासाठी केंद्राने काय निर्णय घेतले?

गेल्या महिन्यात भारतात ई-स्कूटरला लागलेल्या आगीच्या घटनांची चौकशी सुरू केली . याशिवाय शिफारशी करण्यासाठी तज्ज्ञांची एक समितीही स्थापन करण्यात आली आहे. ओकिनावा येथील घटनांच्या चौकशीसाठी केंद्र सरकार स्वतंत्र तज्ज्ञांचे पथक पाठवत आहे. यासह, केंद्र सरकार कठोर ऑटोमॅटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड्स (AIS) कडे वाटचाल करत आहे.

दरम्यान ई-स्कूटर्सना लागलेल्या आगीच्या घटनांबाबत कठोर भूमिका घेत केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी निष्काळजीपणा करणाऱ्या कंपन्यांविरोधात मोठा दंड आकारण्यात येईल आणि सर्व सदोष वाहने परत मागवण्याचे आदेश देण्यात येतील असे सांगितले आहे.

ई- स्कूटरला आग लागण्याची कारणे काय?

या ई-स्कूटरला लागलेल्या आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र अनेक रिपोर्टनुसार, या आगाचे मुख्य कारण स्कूटरमधील बॅटरी आहे. यापैकी बहुतांश ई-स्कूटर्सना आग लागल्यानंतर त्यांच्या बॅटरीमधून निघणाऱ्या धुरामुळे आग लागल्याचे समोर आले. तज्ज्ञांकडूनही या घटनांसाठी प्रथम बॅटरीला दोष दिला. ई-स्कूटरमध्ये बॅटरी हा एकमेव भाग आहे जिथे आग जनरेट होऊ शकते. आणि यामुळेच आगीची घटना घडते.

बरेच ग्राहक 40 किलोमीटर उन्हात गाडी चालवतात आणि परत आल्यावर लगेच बॅटरी चार्ज करतात, यावेळी बॅटरी गरम असते अशावेळी चार्ज केल्याने बॅटरीचा स्फोट होण्याची शक्यता आहे.

भारतासारख्या देशात जेथे तापमान 45 अंशांपर्यंत पोहोचते, तेथे थर्मल रनअवेमुळे बॅटरीचे तापमान 90-100 अंशांपर्यंत पोहोचू शकते, ज्यामुळे आग लागण्याचा धोका वाढतो. परदेशातून आयात केलेल्या बॅटरीज भारतातील हवामान लक्षात घेऊन डिझाइन न केल्यामुळे आगीसारख्या समस्या समोर येतात. हे टाळण्यासाठी भारतातील वातावरण लक्षात घेऊन या बॅटऱ्या देशातच बनवायला हव्यात, असे तज्ज्ञांचे मत आहे.

दरम्यान भारतात ईव्हीसाठी उत्कृष्ट प्रमाणन/चाचणी एजन्सी नसल्याबद्दलही तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. यामध्ये खूप सुधारणा करण्याची गरज असल्याचे ते म्हणतात.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -