जभरात एकसारखी दिसणारी सात माणसं असतात असं बोललं जातं. ही बातमी वाचून तुम्हालासुद्धा आश्चर्य वाटेल. नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अशाच एका मुलाचा व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे, ज्याचा चेहरा तंतोतंत अभिनेता रणबीर कपूर (actor ranbir kapoor) याच्या सारखा आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर झाल्यावर नेटकऱ्यांनीसुद्धा आश्चर्य व्यक्त केलं आहे. या मुलाचा व्हिडीओ सध्या खूपच चर्चेत आहे.
सध्या सोशल मीडियावर एका लहान मुलाचा एक गोंडस व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या मुलामध्ये बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या चेहऱ्याची झलक लोकांना पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या मुलाचे नाव नीरव भट्ट (nirav bhatt) असल्याचे सांगितले जात आहे, जो स्वतःला लहान मॉडेल असल्याचे सांगत आहे. निरव भट्टच्या मते, त्याचे चाहते त्याला छोटा रणबीर कपूर म्हणतात. दरम्यान व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये निरव ‘मला माहित नाही, मला विचारू नका’ असे असं बोलताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्स या लहान मुलाचे कौतुक करत आहेत.
View this post on Instagram
हा व्हिडिओ नीरव भट्टने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे, हा व्हिडीओ अनेक जण पाहत आहेत आणि शेअर सुद्धा करत आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत 40 लाखांहून अधिक व्यक्तींनी पाहिला आहे. त्याचबरोबर या व्हिडिओला एक लाखाहून अधिक लाईक्स शुद्ध मिळाले आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एक यूजर म्हणाल, ‘मला क्षणभर वाटले की तो रणबीर आहे. दोघांमध्ये खूपच साम्य आहे.’ दुसऱ्या यूजरने कमेंट केली की, ‘या मुलात रणबीर कपूरचे बालपण दिसते. तर एकाने म्हणाले आहे की, रणबीर चा बालपणीचा रोल करण्यासाठी या मुलाला कास्ट करा. निरव भट्टच्या या व्हायरल व्हिडीओवर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
हे ही वाचा – टी – 20मध्ये भारताच्या विजयानंतर शाहरुख खानने केले विराटचे कौतुक; अभिनेत्याचे ट्वीट चर्चेत