घरमहाराष्ट्रनाशिकअंबडच्या प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांची भर पावसात मुंबईकडे कूच; २० वर्षापासून प्रलंबित मागण्यांसाठी पायी...

अंबडच्या प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांची भर पावसात मुंबईकडे कूच; २० वर्षापासून प्रलंबित मागण्यांसाठी पायी मोर्चा

Subscribe

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहती मध्ये एस.टी.पी. प्लांटला तातडीने मंजूरी द्यावी व प्लांट उभा करावा तसेच गेल्या वीस वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या अंबड व सातपूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी अंबड नाशिक येथुन मंत्रालय, मुंबई येथे पायी मोर्चा निघाला असुन मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देणार असल्याची माहिती अंबड सातपुर प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांनी दिली. मोर्चात अंबड व सातपूर येथील दोनशेहून अधिक प्रकल्पग्रस्त शेतकरी सहभागी झाले आहेत.

प्रकल्पगस्त शेतकर्‍यांच्या मागण्यासाठी मुंबई मंत्रालय येथे मोर्चा काढण्या पूर्वी अंबड येथील ग्रामदैवत मारुती मंदिर येथे ग्रामस्थांच्या उपस्थितीत मारुतीचे दर्शन घेऊन मोर्चाला सुरुवात करण्यात आली. अंबड सातपुर प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष साहेबराव दातीर समवेत बंडोपंत दातीर, शांताराम फडोळ, माजी नगरसेवक राकेश दोंदे, रामदास दातीर, शरद फडोळ, महेश दातीर, गोकुळ दातीर, त्र्यंबक मोरे, अविनाश फडोळ, शरद कर्डिले, पांडुरंग दोंदे यांच्यासह दोनशे शेतकरी अंबड एक्सलो पॉईन्ट गरवारे चौक मार्गे मुंबई कडे पायी मोर्चाने रवाना झाले आहेत.

या आहेत मागण्या

  • अंबड औद्योगिक वसाहती मध्ये एसटीपी प्लांट उभारावा
  • १९७३ ला औद्योगिक वसाहतीसाठी भूसंपादन करतेवेळी उरलेल्या शेतकर्‍यांच्या जागेत वहीवाटीसाठी सोडलेल्या ४ ते ५ मीटर रस्त्यांचे क्षेत्र वाढवून १२ मीटर व १५ मीटरचे रस्ते मंजूर करण्यात यावे
  • महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकान्वये उद्योगधंदे सुरु करण्यासाठीचे प्रोत्साहन धोरण लागू करण्यात यावे.
  • पीएपी भूखंडापासून वंचित असलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना पीएपी परिपत्रकातील जाचक अटी काढून भूखंड देण्यात यावे.
  • अंबड व सातपूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांची उरलेली जमीन ही रासायनिक सांडपाण्यामुळे नापिक झाल्यानंतर त्याठिकाणी छोटे मोठे उद्योगधंदे चालू केले असताना नाशिक महानगरपालिकेकडून देण्यात येणार्‍या अनधिकृत बांधकामबाबतीतील नोटीसा मागे घेण्यात याव्यात
  • वाढीव घरपट्टी आकारण्यात येऊ नये तसेच प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना पाठविण्यात आलेल्या दंडात्मक नोटीसा मागे घेण्यात याव्यात

पायी मोर्चा मुंबई मंत्रालय येथे पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देणार येणार आहे. : साहेबराव दातीर, अध्यक्ष, प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -