बॉलिवूडमधील हॉट आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून नेहमीच चर्चेत असणाऱ्या मौनी रॉय आणि दिशा पटानी अलीकडे अनेकदा एकत्र दिसून येतात. या दोघींचा बॉण्ड त्यांच्या चाहत्यांना देखील आवडतो. अनेकदा या दोघी सोशल मीडियावर एकमेकींच्या फोटोवर कमेंट्स करताना दिसतात. दरम्यान, सध्या या दोघीही वेकेशनसाठी एकत्र गेल्या आहेत ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मागील दोन दिवसांपूर्वीच मौनीने सोशल मीडियावर दोघींचे काही फोटो शेअर केले होते. अशातच, मौनीने पुन्हा एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये दोघींनीही एकाच रंगाचे कपडे घातलेले दिसत आहेत.
मौनी आणि दिशाने केलं ट्विनिंग
View this post on Instagram
नुकतेच मौनी रॉयने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने आणि दिशाने सफेद रंगाचे शॉर्ट ड्रेस घातला आहे. यातील पहिल्या फोटोमध्ये मौनी दिशासोबत सेल्फी घेताना दिसत आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये मौनी सुंदर पोझ देताना दिसत आहे. या फोटोंवर चाहते अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.
दरम्यान, आगामी काळात दिशा अभिनेता अक्षय कुमारच्या ‘वेलकम टू द जंगल’ (वेलकम 3) आणि साऊथचा सुपरस्टार सूर्याचा ‘कांगुवा’ यासारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहे . दिशा पटानीच्या या चित्रपटांची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे.