घरताज्या घडामोडीवंचिततर्फे नाशिकमधून करण गायकरांना उमेदवारी

वंचिततर्फे नाशिकमधून करण गायकरांना उमेदवारी

Subscribe

नाशिक । वंचित बहुजन विकास आघाडीने रविवारी (दि. 21 एप्रिल) दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी मालती शंकर थविल यांची उमेदवारी घोषीत केल्यानंतर सोमवारी (दि.22 एप्रिल) नाशिक लोकसभा मतदार संघासाठी मराठा क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. वंचितने आपल्या नवव्या यादीची एक्स अकाऊंटवरुन माहिती दिली.
नाशिक लोकसभा मतदार संघात शिवसेना ठाकरे गट व शिंदे गट यांच्यात सरळ लढत असली तरी वंचितमुळे येथे तिरंगी लढत होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे हा मराठा समाजाचा उमेदवार दिला आहे. तर शिंदे गटाकडून इच्छुकांची नावे मराठा समाजाची आहे. त्यामुळे नाशकात मराठा समाजाच्या तिन्ही उमेदवारांमध्ये ही तिरंगी लढत होणार आहे.

नाशकात महाविकास आघाडीकडून मराठा उमेदवार देण्यात आला असून महायुतीकडून मराठा उमेदवारच देण्याची दाट शक्यता आहे. म्हणून वंचितनेही मराठा उमेदवार दिला आहे. तीनही उमेदवारांमध्ये मराठा मतांची विभागणी झाल्यास वंचितची मते अधिक ठरतील.
– अविनाश शिंदे, महानगरप्रमुख, वंचित बहुजन आघाडी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -