घरक्राइममालाड: विनयभंग करणाऱ्या आरोपीला नऊ वर्षात केले १२ वेळा अटक

मालाड: विनयभंग करणाऱ्या आरोपीला नऊ वर्षात केले १२ वेळा अटक

Subscribe

विनयभंग केल्याप्रकरणी एका ३० वर्षीय तरुणाला गेल्या नऊ वर्षात बारा वेळा अटक करण्यात आल्याचे समोर आले आहे.

मुलींचा विनयभंग करणे, छेडछाड करणे या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशीच एक घटना मालाडमध्ये घडल्याचे समोर आले आहे. मालाडमध्ये भर रस्त्यात एका २४ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून या प्रकरणात त्याला यापूर्वी तब्बल बारा वेळा अटक केल्याचे समोर आले आहे. कल्पेश देवधरे, असे या आरोपीचे नाव असून तो कांदिवली पश्चिमेकडील रहिवासी आहे.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, ११ डिसेंबर रोजी मालाड पूर्वेकडील रस्त्यावर आरोपी कल्पेशने एका २४ वर्षीय तरुणीचा विनयभंग केला. ती लग्नाच्या खरेदीसाठी जितेंद्र रोडने जात होती. कल्पेशने तिचा पाठलाग केला आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. ‘तुझ्या बाबांना मी ओळखतो, त्यांची प्रकृती आता कशी आहे’, अशी विचारणा केली. त्यावर तरुणीने माझे बाब हयात नाहीत, असे सांगितले. त्यानंतर अचानक त्याने दुचाकी थांबवली आणि तिला मिठी मारुन तिचा विनयभंग केला. त्यानंतर तरुणीने त्याला ढकलून दिले. तरुणीने मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर आरोपी तेथून पसार झाला. पीडितेने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केल्यानंतर तपास सुरू केला. त्या दरम्यान, या आरोपीविरोधात विविध गुन्हे यापूर्वी देखील दाखल करण्यात आल्याचे समोर आले. तसेच विनयभंग केल्याप्रकरणी त्याला नऊ वर्षात तब्बल बारा वेळा अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – प्रेमासाठी प्रेमी युगुलाची आत्महत्या; तरुणीचा मृत्यू तर तरुण थोडक्यात बचावला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -