घरक्राइमसंतापजनक : जन्मदात्या आईनेच केला दहा दिवसांच्या चिमुकलीचा अडीच लाखांना सौदा ;...

संतापजनक : जन्मदात्या आईनेच केला दहा दिवसांच्या चिमुकलीचा अडीच लाखांना सौदा ; पाच जणांना अटक

Subscribe

नवी मुंबईतील उलवे परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या आईनेच आपल्या दहा दिवसांच्या चिमुकलीचा अडीच लाखांना सौदा केला. याप्रकरणी पोलिसांनी जन्मदात्या आईसह चार जणांना नवी मुंबईत अटक केली. या चिमुकलीची विक्री होत असतानाच पोलीसांनी त्यांना रंगेहाथ पकडले. नवी मुंबईतील उलवे सेक्टर २० मध्ये एक महिला आपल्याच अवघ्या दहा दिवसांच्या चिमुकलीचा सौदा करणार असल्याची माहिती पोलिसांना समजली होती. त्यामुळे या महिलेला रंगेहाथ पकडण्यासाठी एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी आपल्या टीमसमवेत सापळा रचला आणि जन्मदात्या आईसह चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

या प्रकरणाची चौकशी केली असता,त्या चिमुकलीला दत्तक घेण्याची कोणतीही प्रक्रिया आढळली नसून ही अनधिकृत विक्री होत असल्याचे निष्पन्न झाले. या आरोपींकडून पन्नास हजार रुपयाचे पाच बंडल, चार मोबाईल, पॅनकार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या दहा वर्षाच्या चिमुकलीला आणि आईला भिवंडीच्या बाल कल्याण समितीकडे हजर करण्यात येणार असल्याचे उपायुक्त विवेक पानसरे यांनी यावेळी सांगितले. नवी मुंबईत विविध रेल्वे स्टेशन बाहेर अशा नवजात बालकांची विक्री होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.त्यामुळे संशयीत लोकांवर बिट मार्शल नजर ठेवून असणार आहेत. तसेच सोबत असलेल्या बाळाविषयी चौकशी करून संबंधित कागदपत्रे तपासणी करण्यात येईल, असेही उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

हे ही वाचा -Omicron-ओमीक्रॉन सर्वांना मारून टाकणार ! चिठ्ठी लिहीत डॉक्टरने केली पत्नीसह दोन मुलांची हत्या


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -