घरCORONA UPDATEOmicron Symptoms in Kids: लहान मुलांमध्ये ओमिक्रॉनची 'ही' आहेत लक्षणे

Omicron Symptoms in Kids: लहान मुलांमध्ये ओमिक्रॉनची ‘ही’ आहेत लक्षणे

Subscribe

लक्षणांवर योग्य वेळी लक्ष दिले तर त्यावर इलाज करणे सोपे होईल

जगभरात कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस देशातील ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येतही वाढ होत आहेत. आतापर्यंत जगभरात कोरोनाचे जितकेही व्हेरिएंट आले आहेत त्या व्हेरिएंटचा लहान मुलांवर कोणताही प्रभाव झाला नव्हता. मात्र दक्षिण आफ्रिके लहान मुले देखील ओमिक्रॉन व्हेरिएंटचे शिकार झाले आहेत. त्याचप्रमाणे भारतात येणारी कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक असल्याचे देखील अनेक वेळा म्हटले गेले आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनची शिकार झालेल्या लहान मुलांमध्ये ओमिक्रॉनची कोणती लक्षणे आढळली हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

एक्सपर्टनी दिलेल्या माहितीनुसार, ओमिक्रॉन व्हेरिएंटची गंभीरता किती असेल याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही. मात्र त्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. लक्षणांवर योग्य वेळी लक्ष दिले तर त्यावर इलाज करणे सोपे होईल. दक्षिण आफ्रिकेतील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येकामध्ये ओमिक्रॉनची लक्षणे वेगवेगळी असू शकतात. युवकांमध्ये पुढील लक्षणे आढळून आली

- Advertisement -
  • थकवा
  • छातीत दुखणे
  • डोके दुखणे
  • तोडांची चव जाणे
  • वास न येणे
  • घशात खवखव होणे

लहान मुलांमध्ये ओमिक्रॉनची लक्षणे

दक्षिण आफ्रिकेतील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, दक्षिण आफ्रिकेत लहान सर्वाधिक ओमिक्रॉनच्या जाळ्यात आली आहेत. लहान मुलांमध्ये मध्यम ते गंभीर लक्षणे आढळत आहेत. अनेकांना ऑक्सिजन, सपोर्ट थेरपीच्या आधारे रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. अमेरिकेच्या नॅशनल हेल्थ सर्विसनुसार लहान मुलांमध्ये ओमिक्रॉनची पुढील लक्षणे आढळत आहेत.

  • तीव्र ताप येणे
  • थकवा जाणवणे
  • डोके दुखणे
  • घशात खवखवणे

दक्षिण आफ्रिकेत सध्या तरुण लोक आणि लहान मुले ओमिक्रॉन व्हेरिएंटचे सर्वात जास्त शिकार झाले आहेत. लहान मुलांमध्ये ५ वर्षांच्या मुलांचा सर्वाधिक समावेश आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Omicron variant पासून बचाव करायचाय? तर लाइफ स्टाइलमध्ये करा ‘या’ गोष्टींचा समावेश

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -