घरताज्या घडामोडीLive Update: मुंबईत गेल्या २४ तासात ८५१ कोरोनाबाधितांनी केली मात

Live Update: मुंबईत गेल्या २४ तासात ८५१ कोरोनाबाधितांनी केली मात

Subscribe

राज्यात गेल्या २४ तासात ९,४८९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. शुक्रवारी १५६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती, तर शनिवारी हा आकडा कमी होऊन वाढून १५३ इतका झाला. यासह आज ८,३९५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. (सविस्तर वाचा)


मुंबईत मागील २४ तासात ५७५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. एकूण ८५१ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. मागील २४ तासात एकूण २१ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -


साखर कारखान्यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांचं अमित शाहांना पत्र. कारखाना विक्रीच्या गैर व्यवहारांवर कारवाई करण्याची पत्राद्वारे मागणी

- Advertisement -

गेल्या २४ तासा गोव्यात १६९ नवे कोरोनाचे रूग्ण आढळले असून २०७ जणांना कोरोनावर मात केली आहे. यासह ७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.


मुंबईनंतर आता नवी मुंबईतही बोगस लसीकरण झाले असल्याची घटना समोर आली असून दोन्ही घटनेतील आरोपी एकच आहेत. तुर्भे एमआयडीसी मध्ये असलेल्या ॲटोंबर टेक्नॉलॉजी कंपनीत एप्रिल महिन्यात ३५२ कामगारांचे लसीकरण करण्यात आले होते. मुख्य आरोपी डॉ मनीष त्रिपाठी याने केसीईपी हेल्थ केअरच्या नावाने कॅम्प घेत कंपनीतील सर्व कामगारांचे लसीकरण केले होते. यासाठी त्यांनी कंपनीकडून ४ लाख २४ हजार रूपये बिल आकारले.


नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील तहसील कार्यालयाच्या इमारतीवर शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ४३ वर्षीय भीमराव चंपती शिरसाट लोहा तालुक्यातील उमरा येथील रहिवासी असून कर्जबाजारी पणामुळे आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.


उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून पुष्कर सिंह धामी यांच्या नावावर शिक्कामोर्तब. (सविस्तर वाचा) 


पंढरपूरला पायी वारीसाठी निघालेल्या बंडातात्या कराडकरांनी आंदोलन स्थगित केले आहे. आंदोलन मागे घेण्याचा निरोप दिल्याची माहिती समर्थकांनी दिली आहे.


माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने समन्स बजावल्यानंतर कायदेशीर सल्ला घेण्यासाठी अनिल देशमुख दिल्लीला रवाना झाले आहेत. अनिल देशमुख आता सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावणार का अस प्रश्न उपस्थित केला जात आहे.


माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ED कडून तिसऱ्यांदा समन्स बजावण्यात आला आहे. पहिल्या दोन समन्सनंतर अनिल देशमुख ईडीसमोर हजर राहिले नाही. त्यामुळे त्यांना तिसऱ्यांदा समन्स बजावण्यात आला असून ५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता मुंबई ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


देशात गेल्या २४ तासात ४४,१११ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून ५७,४७७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ७३८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात सध्या ४,९५,५३३ अँक्टिव्ह रुग्ण आहेत.


सचिन वाझेंची कारागृहात चौकशीसाठी CBI ला परवानगी देण्यात आलीय. त्यामुळे आता सचिन वाझे यांच्यावर तळोजा कारागृहात चौकशी होणार आहे. CBI ने सचिन वाझे यांची पुढच्या तपासासाची चौकशी करायची असल्याची विनंती केली होती त्यानंतर CBI ला परवानगी देण्यात आली असून CBIची एक टिम तळोजा जेलमध्ये जाऊन सचिन वाझे यांची चौकशी करणार आहे.


पंढरपूरच्या दिशेने पारी वारीसाठी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दीघीजवळील संकल्प गार्डन मंगल कार्यालयात त्यांना ठेवण्यात आले आहे. मंगल कार्यालयाबाहेर त्यांचे काही समर्थक ठिय्या मांडून बसले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -