घरताज्या घडामोडीसंजय राऊत यांचा गुप्त दिल्ली दौरा, भाजप नेत्यांच्या घेतल्या भेटी

संजय राऊत यांचा गुप्त दिल्ली दौरा, भाजप नेत्यांच्या घेतल्या भेटी

Subscribe

संजय राऊत यांनी दिल्ली दौरा केल्यामुळे महाराष्ट्रात लवकरच काहीतरी मोठा निर्णय होण्याची शक्यता

महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सत्तांतराच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसनं एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं आहे. या महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत धुसपूस असल्याच्या चर्चा सुरु आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यामध्ये महत्त्वाचा भाग असणारे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी गुप्त दिल्लीवारी केली आहे. या दिल्लीवारीमुळं राज्यात चर्चांना उधाण आले आहे. अनेकजण तर्क लावण्यात मग्न झाले आहेत. संसदेच्या स्थायी समितीची बैठक नसताना राऊत यांनी दिल्लीवारी केल्यामुळे संशयाची टोक राऊतांवर गेलं आहे. संजय राऊत यांनी भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याचं सांगितल्यामुळे अनेक नेते वैचारिक अस्वस्थत झाले आहेत.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकार ५ वर्षे पुर्ण करणार असे सांगितले आहे. महाविकास आघाडीतील प्रत्येक नेता हे सरकार ५ वर्ष टिकणार असे सांगत आहे. यामुळे महाविकास आगाडीमध्ये समन्वय नसल्यामुळे वादविवाद सुरु आहेत का? तसेच संभ्रमही निर्माण झाला आहे. यापुर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यापुर्वी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी अमित शाह यांनी भेट घेतली आहे. आता कारण नसताना संजय राऊत यांनी दिल्लीवारी केली. या दिल्ली दौऱ्यामध्ये अनेक भाजप नेत्यांना भेटलो असल्याचे राऊत यांनी सांगितले परंतु कोणत्या नेत्यांना आणि का भेटले याबाबत काही वक्तव्य केलं नाही यामुळे राजकीय मंडळी तर्क वितर्क लावत आहेत.

- Advertisement -

खासदार संजय राऊत यांनी दिल्ली दौरा केल्यामुळे महाराष्ट्रात लवकरच काहीतरी मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यातील १२ आमदारांचा प्रश्न प्रलंबित आहे. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाबाबतही निर्णय अद्याप झालेला नाही यामुळे राजकारणात मोठा भूकंप येणार का अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात कोणता मोठा निर्णय होतोय का? याकडेही साऱ्यांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट कोणत्या कारणावर होती हे देखील अद्याप समोर आलं नाही परंतु संजय राऊतांच्या भेटीमुळे सत्तांतर होण्याचा संशय चांलगाच बळावला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -