Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम रोजच्या मारहाणीला कंटाळला, अखेर अल्पवयीन मुलाने जन्मदात्यावर चालवली कुऱ्हाड

रोजच्या मारहाणीला कंटाळला, अखेर अल्पवयीन मुलाने जन्मदात्यावर चालवली कुऱ्हाड

Related Story

- Advertisement -

१६ वर्षाच्या अल्पवयीन मुलाने आपल्या दारुड्या जन्मदात्याची निघृण हत्या केल्याचे समोर आले आहे. दररोज दारुच्या नशेत मुलाचे वडील त्याला मारहाण करत होते. त्यामुळे मुलाने हे शेवटचे पाऊल उचलले. ही घटना राजस्थानचा कोटा जिल्ह्यात घडली आहे. कोटा जिल्ह्याच्या इटावा ठाण्याचे एसएचओ बजरंग लाल म्हणाले की, ‘शुक्रवारी घटना जवळपास साडे तीन वाजता घडली. आरोपी मुलाने कुऱ्हाडीने आपल्या वडिलांवर अनेक वार केले. ज्यामुळे त्याचा वडिलांचा घटनास्थळी मृत्यू झाला. या घटनेच्या वेळी घरातील इतर सदस्य दुसऱ्या रुममध्ये झोपले होते.’

घटनेच्या सुरुवातीच्या तपासामध्ये समोर आले की, मृत्यू झालेला आबिद अली (४५) हिस्ट्री शीटर होता. त्याच्या विरोधात हत्या आणि लूट केल्यासहित २५ आरोप होते. काही प्रकरणात त्याला दोषी ठरवण्यात आले होते. त्याला दारु पिण्याचा खूप सवय होती.

- Advertisement -

माहितीनुसार मृत अली आपली पत्नी आणि दोन मुलं आणि मुलीला दारुच्या नशेत मारहाण करत असे. एसएचओने सांगितले की, ‘१० शिकणाऱ्या अल्पवयीने मुलाने रोजच्या मारहाणीला कंटाळून वडिलाची हत्या केली होती. पोस्टमॉर्टनंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपविण्यात आला आहे. मृत अलीच्या भावाच्या तक्रारीवर अल्पवयीन मुलाविरोधात हत्येचा प्रकरणात गुन्हा दाखल केला गेला आहे. आतापर्यंत मुलाला अटक करण्यात आली नाही आहे.’


हेही वाचा – संतापजनक! वडिलांनी पैसे दिले नाही म्हणून बेरोजगार मुलाने केली हत्या


- Advertisement -

 

- Advertisement -