घरताज्या घडामोडीरायगडमध्ये येताना..

रायगडमध्ये येताना..

Subscribe

पनवेल येथील नव्याने सुरू करण्यात आलेल्या कार्यालयात समारंभपूर्वक पहिल्या अंकाचे मान्यवरांकडून प्रकाशन होत आहे.

गेल्या ३० वर्षांची परंपरा असलेल्या दैनिक ‘आपलं महानगर’ची आजपासून स्वतंत्र रायगड आवृत्ती वाचकांच्या भेटीला येत आहे. मुंबईत वाचकांनी भरभरून प्रेम दिल्यानंतर नाशिक आणि त्यानंतर ठाणे आवृत्ती सुरू झाली. तेथेही उदंड प्रेम मिळाले. ‘आपलं महानगर’मध्ये छापून आलेली बातमी विश्वासार्ह असते, ही वाचकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया सर्व काही सांगून जाते..

दोन वर्षांपूर्वी ‘आपलं महानगर’ची मुंबई आवृत्ती रायगड जिल्ह्यातील वाचकांपर्यंत पोहचण्यास सुरुवात झाली. अल्पावधीत वाचकांनी आणि आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी रायगडची स्वतंत्र आवृत्ती असावी, अशी सूचना वारंवार केली. यावर सर्व बाजूंनी विचार केल्यानंतर अखेर रायगड आवृत्तीचा अंतिम निर्णय झाला. आजपासून ही आवृत्ती वाचकांच्या भेटीला येत आहे. पनवेल येथील नव्याने सुरू करण्यात आलेल्या कार्यालयात समारंभपूर्वक पहिल्या अंकाचे मान्यवरांकडून प्रकाशन होत आहे.

- Advertisement -

रायगड.. एक ऐतिहासिक भूमी! महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा लाडका रायगड किल्ल्याचे नाव या जिल्ह्याला दिल्यानंतर ‘कुलाबा जिल्हा’ हा ‘रायगड जिल्हा’ या नावाने ओळखला जाऊ लागला. माजी अर्थमंत्री डॉ. सी. डी. देशमुख, यांच्यासह प. पू. पांडुरंगशास्त्री आठवले, प.पू. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांची ही पुण्यभूमी! दीडशेहून अधिक किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा या जिल्ह्यात आहे. घनदाट जंगले, सह्याद्रीच्या डोंगर रांगा, विविध ठिकाणची पर्यटन स्थळे, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली महाडची क्रांतीभूमी, तेथील चवदार तळे, देखणेपण टिकवून असलेल्या लेण्या, पक्षी आणि प्राणी अभयारण्य, विविध ठिकाणची पर्यटन स्थळे, विविध धर्मियांची धार्मिक स्थळे, मंदिरे, उत्तमोत्तम शिक्षणाच्या सुविधा, रस्ते आणि रेल्वे मार्गाचे जाळे ही या जिल्ह्याची ओळख नव्हे तर श्रीमंती आहे.

उरण परिसरात बॉम्बे हायमध्ये नैसर्गिक वायूचा साठा आढळल्यानंतर रायगडात रासायनिक कारखानदारी फोफावली. पेट्राकेमिकल, पेट्रोलियमचे प्रचंड कारखाने येथे निर्माण झाले. तळोजेपासून महाडपर्यंत आणि साळावपासून खालापूरपर्यंत उद्योगांचे जाळे विस्तारलेले आहे. उद्योगप्रधान अशी या जिल्ह्याची ओळख झाली असली तरी खरी या जिल्ह्याची ओळख ‘भाताचे कोठार’ अशीच आहे. काळाच्या ओघात शेतजमिनी विकण्याचे प्रमाण वाढले आणि भाताचे कोठार काहीसे रिते होत गेले. मात्र गेल्या दोन-चार वर्षांपासून तरुणाई शेतीकडे आकर्षित होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. हे प्रमाण वाढले तर आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेतीतून भरघोस उत्पादन निघून भाताचे कोठार पुन्हा भरेल, असा विश्वास वाटतो. शेती पर्यटन ही संकल्पना रायगडात चांगल्या प्रकारे रूजत आहे.मोठ्या नद्याही या जिल्ह्यात आहेत. त्या जशा फलदायी आहेत तितक्याच त्या उपद्रवीही ठरत असल्याचे दरवर्षी येणार्

- Advertisement -

या पुरातून दिसून येते. काही तरी कारणामुळे दरडी सहजपणे कोसळत आहेत. काही भागात नैसर्गिक आपत्ती पाचवीला पुजल्यासारखी झाली आहे. याची कारणे शोधावी लागतील. याकरिता जनता आणि शासन यातील महत्त्वाचा दुवा म्हणून ‘आपलं महानगर’ यापुढे या समस्यांकडे पाहणार आहे. चांगले ते चांगले आणि वाईट ते वाईटच, ही ‘आपलं महानगर’ची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. राजकारणी हे बर्

याचदा टीकेचे धनी होतात, परंतु त्यांच्या चांगल्या भूमिकेचेही ‘आपलं महानगर’ने कौतुक केले आहे. महानगरची ही भूमिका यापुढेही कायम असेल. रायगड जिल्ह्याच्या यापुढील जडणघडणीत खारीचा वाटा उचलण्याचा संकल्प आम्ही यानिमित्ताने करीत आहोत. आपले सर्वांचे ‘आपलं महानगर’वर काल प्रेम होत, आजही आहे आणि उद्याही राहणार, याबद्दल यत्किंचितही शंका नाही.


हेही वाचा – आपलं महानगरच्या रायगड आवृत्तीचे आज प्रकाशन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -