घरताज्या घडामोडीशिळ्या कढीला ऊत आणण्याचा संजय राऊतांचा प्रयत्न, प्रवीण दरेकर यांची टीका

शिळ्या कढीला ऊत आणण्याचा संजय राऊतांचा प्रयत्न, प्रवीण दरेकर यांची टीका

Subscribe

संजय राऊत यांनी रांणेंच उदाहरण देऊन कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा देण्याचं काम केलं आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी नगर जिल्ह्यात एका कार्यक्रमात मी पुन्हा येईल.. मी पुन्हा पुन्हा येईल असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला होता. या वक्तव्यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न संजय राऊत करत आहेत. रिकामटेकडी कोण आहेत हे राज्यातील जनता पाहत आहेत. पूरग्रस्त भागात आम्ही पाण्यात उतरुन दौरा केला संजय राऊत कुठे दौरा करायला गेले का? असा सवालही प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

पुन्हा येईल, पुन्हा येईल हा विषय जुना झाला आहे. संजय राऊत यांच्याकडील विषय संपलेले दिसत आहेत. म्हणून शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न आहे. देवेंद्र फडणवीस निश्चितपणे या महाराष्ट्राच्या राजकारणात लोकनेते आहेत काल होते आज आहेत आणि उद्याही आहेत तसेच ते पुन्हा येतील असे प्रत्युत्तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. तसेच नारायण राणेंवर केलेल्या टीकेलाही दरेकरांनी उत्तर दिलं आहे. केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे हे शिवसैनिक होते, ते त्यांनी कधी नाकारलं नाही. संजय राऊत यांनी रांणेंच उदाहरण देऊन कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा दिल्याचे काम केलं आहे. यामुळे संजय राऊत यांच्या त्या वक्तव्याला काही अर्थ नाही असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.

- Advertisement -

रिकामटेकडे काय करतात ते जनता पाहते

शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांना रिकामटेकडे असून त्यांच्याकडे खूप वेळ असे म्हटलं आहे. तसेच त्यांचं डोकंही खाली असल्याचा टोला लगावला आहे. यावरही दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी बोलताना उक्ती आणि कृती याचं तारतम्य बाळगले पाहिजे. पुपरस्थितीमध्ये संजय राऊत कुठे पाहणी दौरा करायला गेले का? पाण्यात उतरले का? केवळ मीडियासमोर वक्तव्य करणं हे वेगळं असतं, तौत्के वादळ आलं तेव्हाही पाहणी करण्यास गेलो होतो. यामुळे रिकाम टेकडे दौरा करतात की टीका करतात हे राज्यातील जनता पाहत आहे असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.

संजय राऊत यांची टीका

कार्यक्रमादरम्यान संजय राऊत यांनी फडणवीस यांचे मी पुन्हा येईल या वाक्याचा उच्चार केला आहे. मी पुन्हा येईल.. मी पुन्हा येईल.. जोपर्यंत शिवसेनेचा झेंडा आहे तोपर्यंत मी पुन्हा येईल असं म्हणत संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टोला लगावला आहे. तसेच दिल्लीच्या तक्तावरही भगवा फडकवू आणि हारलेल्या जागा पुन्हा जिंकणे हीच बाळासाहेब यांना मानवंदना राहील असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : कुठेही जा, लोक तुम्हाला शिवसैनिक म्हणूनच ओळखणार, संजय राऊतांचा राणेंना खोचक टोला


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -