घरताज्या घडामोडीLive Update: मंत्रिमंडळ विस्तारावर मोदींच्या निवासस्थानी सुरु असलेली बैठक संपली

Live Update: मंत्रिमंडळ विस्तारावर मोदींच्या निवासस्थानी सुरु असलेली बैठक संपली

Subscribe

मंत्रिमंडळ विस्तारावर मोदींच्या निवासस्थानी सुरु असलेली बैठक संपली


मंत्रिमंडळ विस्तारावर मोदींच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक, या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी, जेपीन नड्डा, राजनाथ सिंह उपस्थित आहेत.

- Advertisement -

निवृत्त पोलिस अधिकाऱ्याचा मुलावर गोळीबार, घरगुती वादातून मुलगा, पत्नीवर गोळीबार, नवी मुंबईतील ऐरोली भागातील घटना


नारायण राणे दिल्लीकडे रवाना, मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची चिन्हं

- Advertisement -

वाखरी ते पंढरपूर या दीढ किलोमीटरच्या पायी वारीला परवानगी देण्यात आली आहे. यंदाच्या एकादशीला १९५ महाराज मंडळींना विठ्ठलाचे मुखदर्शन मिळणार आहे.


कोरोना महामारित हॉट्सपॉट ठरलेल्या धारावीत


आज एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत धारावीत पहिल्यांदा दैनंदिन रुग्णसंख्या शून्यावर आली आहे. दादरमध्ये गेल्या २४ तासात अवघ्या ३ रुग्णांची नोंद झाली आहे तर माहिमध्ये ६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.


मराठा समाजाची दिशाभूल करणे आमच्या रक्तात नाही – संभाजीराजे छत्रपती


जीआर काढून मराठा समाजाला आरक्षण द्या – उदयनराजे


खासदार संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्यात बैठक सुरु


कोरोना पॉझिटिव्हीटी रेटनुसार कोल्हापूरात कोरोना रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक – अजित पवार


तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांसाठी टास्क फोर्सची तयारी – अजित पवार


कोल्हापूरातील कोरोना चाचण्यांचे प्रमाण दीडपट दुपटीने वाढवा – अजित पवार


गृहविलगीकरण कमी करुन संस्थात्मक विलगीकरण वाढवण्यावर भर देणार – अजित पवार


संभाजीराजे छत्रपती आज दुपारी उदयनराजेंची भेट घेणार आहेत. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर दोघांच्या भेटीला महत्त्व आहे. दोघांमध्ये काय चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.


पुण्यात आजपासून निर्बंधांमध्ये अधिक शिथिलता देण्यात आली आहे. पुण्यातील मॉल्स,चित्रपटगृहे,वाचनालय आज पासून सुरु होणार आहेत. पुण्यातील दुकाने संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.


संत मुक्ताई पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान


दादर मार्केटमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे.


मुंबईत पेट्रोलचे दर १०२.५८ रुपये प्रति लिटर तर दिल्लीत पेट्रोलचे दर ९६.४१ रुपये प्रति लिटर इतके आहेत.


उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शाहू छत्रपतींची न्यू पॅलेसवर भेट. बैठकीला सुरुवात. मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता


देशात गेल्या २४ तासात ७०,४२१ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर १ लाख १९ हजार ५०१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्याचप्रमाणे गेल्या २४ तासात ३ हजार ९२१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात सध्या ९ लाख ७३ हजार १५८ अँक्टिव्ह रुग्ण आहे.


पुढील ३ तासात ठाणे,रायगड,रत्नागिरी,सिंधुदूर्ग जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.


मिल्खा सिंह यांच्या पत्नीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्या ८५ वर्षांच्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती.


 

दापोली गावाला मुसळधार पावसाचा धोका


पर्यटन स्थळांवर नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. पोलिसांनी पर्यटकांवर कारवाई करायला सुरुवात केली आहे. पर्यटकांच्या वाहनांमुळे रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.


रत्नागिरीत २ दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरीच्या अनेक भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.


अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण झाली आहेत. आजच्या दिवशी सुशांतने त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती.


हिंगोली राज्य महामार्गावर पुलाच्या खड्ड्यात गाडी पडून ४ जणांचा मृत्यू झाला. अपघातात मृत्यू झालेले हे लोणार तालुक्यातील खळेगाव,पळखेडा येथील रहिवाशी होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -