घरट्रेंडिंगरतन टाटांमुळे अपंग बेवारस श्वानाला मिळाले हक्काचे घर

रतन टाटांमुळे अपंग बेवारस श्वानाला मिळाले हक्काचे घर

Subscribe

देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. यात रतन टाटांचे प्राणीप्रेम जगजाहीर आहे. खासकरुन त्यांचे श्वानांवर अधिक जीव आहे. बऱ्याचदा रतन टाटा बेवारस श्वानांना स्वत:चे हक्काचे प्रेमाचे घर मिळवून देण्यासाठी सोशल मीडियावर अनरक पोस्ट शेअर करत असतात. यात रतन टाटांनी स्प्राईट नावाच्या एका बेवारस श्वानाला हक्काचे घर मिळाल्याची यशस्वी स्टोरी पोस्ट केली आहे. रतन टाटांनी डिसेंबर २०२० रोजी या श्वानाला दत्तक घेण्याचे आवाहन एका इंस्ट्राग्राम स्टोरीच्या माध्यमातून केले होते.

तुम्ही यापूर्वी माझी दोनवेळी उदारपणे आणि यशस्वीरित्या मदत केली त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. पण आता स्प्राईटसाठी एक प्रेमळ कुटुंबिय शोधण्यासाठी मला पुन्हा मदत करा अशी विनंती आपणास करतो. या श्वानाने खूप अडचणी झेलल्या असून एका अपघातामुळे या श्वानाचा मागचा एक पाय दुर्घटनाग्रस्त झाला आहे. अशी पोस्ट १२ डिसेंबरला रतन टाटांनी केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ratan Tata (@ratantata)

- Advertisement -

या स्टोरीतील स्प्राईट आता पूर्णपणे ठीक झाला असून त्याला स्वत;चे प्रेमळ घर मिळाले आहे. यावरच आज रतन टाटांनी इंस्टाग्रामवर नवीन तीन पोस्ट शेअर करत स्प्राईटला दयाळू व्यक्तींनी दत्तक घेतल्याचे सांगितले आहेत. यावर त्यांनी पहिली व्हिडिओ पोस्ट करत लिहिले की, तुम्हाला स्प्राईट आठवत असेल, ज्या अपंग श्वानाला घराची गरज होती.

- Advertisement -
 helps paralysed stray dog find a forever home
रतन टाटांमुळे अपंग बेवारस श्वानाला मिळाले हक्काचे घर

तर दुसऱ्या पोस्टमध्ये स्प्राईटला हक्काचे प्रेमळ घर मिळवून दिल्याबद्दल रतन टाटांनी अॅनिमल गार्डियंस मुंबई आणि अॅनिमल रेस्क्यूअर कावेरी भारद्वाज यांना धन्यवाद दिले आहेततर शेवटच्या पोस्टमध्ये रतन टाटांनी नव्या घरचा सदस्य झालेल्या जुलिलेंट स्प्राईटचा एका फोटो पोस्ट केले आहे.

helps paralysed stray dog find a forever home
रतन टाटांमुळे अपंग बेवारस श्वानाला मिळाले हक्काचे घर

रतन टाटांचे प्राणी प्रेम म्हणे टाटा ग्रुपचे ग्लोबल हेडक्वार्टर म्हणजेच बॉम्बे हाउसचा काही भाग रस्त्यावरील कुत्र्यांसाठी तयार केला आहे. या कुत्र्यांमधील सगळयात लोकप्रिय असा एक काळ्या पांढऱ्या रंगाचा कुत्रा आहे. ज्याचं नाव गोवा आहे. असं म्हणतात की, गोवा रतन टाटांचा सगळ्यात आवडता कुत्रा आहे. रतन टाटा या कुत्र्याला भेटण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात.


देशात महागाईने तोडले आजवरचे सर्व विक्रम, मे महिन्यात गाठला नव्याने १२.९४ टक्क्यांचा टप्पा


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -