घरCORONA UPDATECorona Live Update: मुंबईत २४ तासांत आढळले १,८५४ नवे रुग्ण, २८ रुग्णांचा...

Corona Live Update: मुंबईत २४ तासांत आढळले १,८५४ नवे रुग्ण, २८ रुग्णांचा मृत्यू!

Subscribe

मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार ८५४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ७७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ३९ हजार ५३२ वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ७ हजार ५०२ रुग्णांचा मृत्यू झाला असून १ लाख १२ हजार ७४३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच सध्या १८ हजार ९७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती महापालिकेने दिली आहे.

- Advertisement -

राज्यात गेल्या २४ तासांत १४ हजार ८८८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २९५ रुग्णांच्या मृत्युची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ७ लाख १८ हजार ७११वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ५ लाख २२ हजार रुग्ण रिकव्हर झाले असून १ लाख ७२ हजार ८७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

चेन्नईतील ९४ वर्षांच्या वृद्ध महिलेने आणि तिच्या ७१ वर्षांच्या मुलीने कोरोना मात केली आहे. सध्या तमिळनाडूतील ३ लाख ९१ हजार ३०३ कोरोनाबाधितांचा आकडा असून ३ लाख ३२ हजार ४५४ रुग्ण रिकव्हर झाले आहेत.


अभिनेत्रा तमन्ना भाटिया हिच्या आई-वडिलांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तमन्ना आणि तिच्या स्टाफचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. याबाबतची माहिती स्वतः तमन्नाने सोशल मीडियावर पोस्टमधून दिली आहे.


सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माणिकराव कोकाटे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांना कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य यंत्रणेतील सूत्रांनी दिली आहे.


२४ तासात ६७,१५१ नव्या रूग्णांची नोंद; १ हजारांहून अधिकांचा मृत्यू

जगभरासह देशात कोरोनाचा कहर सातत्याने वाढतांना दिसत आहे. दररोज जगातील सर्वात नवीन कोरोनाचे रुग्ण भारतात आढळले येत आहे. भारतात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांचा आकडा ३२ लाखांवर पोहोचला असून गेल्या २४ तासात कोरोनाचे ६७ हजार १५१ नवे रूग्ण आढळले असून १ हजार ५९ जणांचा जीव कोरोनामुळे गेल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. (सविस्तर वाचा)


कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांचा आकडा ३२ लाखांवर

जगभरासह देशात कोरोनाचा कहर सातत्याने वाढतांना दिसत आहे. दररोज जगातील सर्वात नवीन कोरोनाचे रुग्ण भारतात आढळले येत आहे. भारतात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांचा आकडा ३२ लाखांवर पोहोचला असून गेल्या २४ तासात कोरोनाचे ६७ हजार १५१ नवे रूग्ण आढळले असून १ हजार ५९ जणांचा जीव कोरोनामुळे गेल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.


नागपुरातील अतिरिक्त पोलीस आयुक्त निलेश भरणेंना कोरोनाची बाधा

नागपूरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त IPS निलेश भरणे यांना कोरोनाची लागण झाली आहे. कर्तव्य बजावत असताना १९ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तसेच वरिष्ठ पोलीस निरिक्षक संतोष खांडेकर, वजीर शेख यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.


माजी कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत कोरोना पॉझिटिव्ह

माजी कृषी राज्य मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती त्यांनी स्वत:च दिली आहे. फेसबुकवर पोस्ट करत त्यांनी ही माहिती दिली आहे. इस्लामपूरमधील घरीच त्यांनी सेल्फ क्वारंटाइन केले आहे.


राज्यात गेल्या २४ तासांत १० हजार ४२५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ३२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ७ लाख ३ हजार ८२३वर पोहोचला असून यापैकी आतापर्यंत २२ हजार ७९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -