घरताज्या घडामोडीLive Update: पेट्रोल-डिझेल दर स्वस्त केल्यानंतर आशिष शेलारांनी मोदींचे मानले आभार

Live Update: पेट्रोल-डिझेल दर स्वस्त केल्यानंतर आशिष शेलारांनी मोदींचे मानले आभार

Subscribe

मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क अनुक्रमे ५ रुपये आणि १० रुपयांनी कमी केल्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी मोदी सरकारचे आभार व्यक्त केले. तसेच आता महाराष्ट्रातील वसूल सरकार आपले कर माफ करून किती दर कमी करणार? आता दिसू दे ठाकरे सरकारचे जनतेवरचे प्रेम, असे शेलार म्हणाले आहेत.

- Advertisement -

भारतीय संघाच्या नव्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविडची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची माहिती बीसीसीआयने दिली आहे.

- Advertisement -

ऐन दिवाळीच्या दृष्टीकोनातून पेट्रोल-डिझेल स्वस्त झालं आहे. पेट्रोल ५ रुपयांची तर डिझेल १० रुपयांनी स्वस्त झालं आहे.


राज्यात गेल्या २४ तासांत १ हजार १९३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ हजार ५१९ जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या राज्यात १५ हजार ११९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


भारताच्या स्वदेशी कोरोना प्रतिबंधात्मक लसीला म्हणजे भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेकडून आपात्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे.


रहस्यकथाकार गुरुनाथ नाईक यांचं पुण्यात निधन झालं. अनेक मराठी मासिकांमधून नाईक यांनी लिखाण केलं आहे. गुरुनाथ नाईक महिन्याकाठी सात ते आठ कांदबऱ्या सहजरित्या लिहायचे, असं म्हटलं जात.


सीएसएमटी ते भायखळा दरम्यान रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने लोकल खोळंबल्या आहेत. अर्ध्या तासापासून सीएसएमटी ते भायखळा दरम्यान वाहतूकीचा खोळंबा झाल्याची माहिती समोर येत आहे.


दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील लसीकरण ४ ते ७ नोव्हेंबर पर्यंत बंद राहणार आहे. ८ नोव्हेंबरपासून मुंबईतील लसीकरण नेहमीप्रमाणे सुरू होईल.


पंतप्रधान मोदींनी देशातील सर्व मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली. प्रत्येक राज्यातील लसीकरणाचा आढावा घेतला.


घराघरात लसीकरण पंतप्रधानांचा नवा मंत्र


कमी लसीकरण झालेल्या राज्यांची पंतप्रधान मोदींनी घेतली बैठक घेतली.


भाजप नेते अनिल बोंडेंची यांची अमरावती गटविकास अधिकाऱ्याला फटके मारण्याची धमकी. याविरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला आहे.


समीर वानखेडे यांचा एनसीबी कार्यालयासमोर शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून सत्कार


रविवार पासून २ लाखांहून अधिक तिकीट विक्री झाली आहे. लसीकरण पूर्ण झालेल्यांना एकदिवसीय लोकल प्रवासाचे तिकीट देण्यास सुरुवात केल्यापासून तिकीट  विक्रीत मोठी घट झाली आहे.


दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात गुरुवार शनिवार आणि रविवार हे तीन दिवस लसीकरण बंद राहिल.


पंतप्रधान मोदी ग्लासगोमधून भारतात परतले


काबूलमध्ये लष्करी रुग्णालयावर बॉम्ब हल्ला तसेच गोळीबार करण्यात आला आहे. यात जवळपास १९ जणांचा मृत्यू झाला तर ५० जण जखमी झाले आहेत. हा हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने स्वीकारली आहे.


राज्यांच्या लसीकरणाबाबत पंतप्रधान मोदी आज सर्व राज्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत देशातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत.


कोव्हॅक्सिनच्या आपतकालीन वापरासाठी जागतिक आरोग्य संघटेच्या बैठकीत होणार महत्त्वाचा निर्णय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -