घरमहाराष्ट्रसमीर वानखेडे घालतात १ लाखाचं टीशर्ट? फोटो होतोय व्हायरल

समीर वानखेडे घालतात १ लाखाचं टीशर्ट? फोटो होतोय व्हायरल

Subscribe

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक सातत्याने आरोप करत आहे. नुकताच त्यांनी वानखेडे १ लाख रुपयांचे पँट, ७० हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचे शर्ट आणि २५-५० लाख रुपयांची घड्याळे घालतात, असा दावा केला. दरम्यान, समीर वनाखेडे यांचा एक ब्लॅक टीशर्ट घातलेला फोटो व्हायरल होत आहे. या टीशर्टची किंमत लाखोंच्या घरात आहे.

समीर वानखेडे यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. त्यात त्यांनी ब्लॅक शर्ट घातलेला दिसतोय. सोबतच हा टीशर्ट एका मोठ्या ब्रँडचा असल्याचा फोटो देखील व्हायरल होत आहे. हा टीशर्ट फिलिप प्लेइन कंपनीचा आहे. याची किंमत १ हजार ५२७ डॉलर म्हणजे १ लाख १३ हजार ८५९ रुपये एवढी आहे.

- Advertisement -

फिलिप प्लेन हा एक जर्मन फॅशन डिझायनर आणि फिलिप प्लेन इंटरनॅशनल ग्रुपचा संस्थापक आहे ज्यात फिलिप प्लेन, प्लेन स्पोर्ट आणि अब्जाधीश ब्रँडचा समावेश आहे.

- Advertisement -

दरम्यान, समीर वानखेडे यांनी घातलेला टी-शर्ट ओरीजनल आहे की नाही याची पुष्टी त्यांनी केलेली नाही.

सच्चा अधिकारी महागडे कपडे कसे विकत घेऊ शकतो?

नवाब मलिक यांनी समीर वानखएडे महागडे कपडे वापरतात असा दावा केला. वानखेडे १ लाख रुपयांचे पँट, ७० हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचे शर्ट आणि २५-५० लाख रुपयांची घड्याळे घालतात. एक प्रामाणिक आणि सच्चा अधिकारी एवढी महागडे कपडे कसे विकत घेऊ शकतो? असा सवाल करत त्यांनी इतर लोकांना चुकीच्या पद्धतीने अडकवून कोट्यवधी रुपये वसूल केले आहेत? असा आरोप नवाब मलिक यांनी केला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -