घरताज्या घडामोडीLandslide Disaster : दरड कोसळण्यापूर्वीच मिळणार अलर्ट; पोलादपूरच्या तरुणांचे संशोधन

Landslide Disaster : दरड कोसळण्यापूर्वीच मिळणार अलर्ट; पोलादपूरच्या तरुणांचे संशोधन

Subscribe

भविष्यात अशी पुनरावृत्ती होणार नाही यासाठी पोलादपूरच्या तरूणांचा पुढाकार

अतिवृष्टीमुळे २२ जुलैला महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. महाडसह पोलादपूरमध्येही दरड कोसळून जीवितहानी झाली. ​त्यामुळे अनेक गावेच्या गावे उध्वस्त होऊन, अनेकांचे संसार उघड्यावर पडले. त्यामुळे भविष्यात अशी पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. पोलादपूर तालुक्यातील सवाद गावातील तरुणाने आपल्या शिक्षणाचा पुरेपूर उपयोग करत नारायण अ‍ॅलर्ट नावाचे यंत्र तयार केले आहे. हे यंत्र नदीच्या किनारी, डोंगर भागात लावल्यास पुराची पाणी पातळी वाढली, तर सेन्सर सिस्टिम चालू होऊन सायरनचा आवाज १० किमी अंतरावर जाईल. तसेच डोंगरामध्ये लावल्यास माती किंवा दगड खाली आल्यास सेन्सर वाजेल. यामुळे नागरिक सतर्क होऊन घरे खाली करतील आणी त्यांचा जीव वाचण्यास मदत होईल.

या नारायण अलर्ट यंत्राच्या सायरनचा आवाज १ – १० किलोमीटर अंतरावर जाऊ शकतो. सद्यस्थितीत सदरचे यंत्र विजेवर चालविले जात आहे. मात्र ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित झाल्यास यंत्र बंद पडण्याची शक्यता असल्याने बॅटरीवर चालविण्यात येणार आहे. यासाठी खर्च जास्त असल्याने निधी जमा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सामाजिक संस्थेच्या माध्यमातून निधी मिळाला तर सर्व पुरग्रस्त गाव, दरड क्षेत्र गावात आपण हे यंत्र लावू शकतो. मात्र यासाठी सामाजिक संघटनांसह लोकप्रतिनिधींनी आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन या तरुणाने केले आहे. पोलादपूरमधील तरूणांनी हे नारायण अलर्ट यंत्र तयार करून १ पुरग्रस्त गाव, २ दरड क्षेत्र गाव या ठिकाणी मोफत लावत आहे. या तरूणांनी नारायण अलर्ट हे यंत्र सचिनदादा धर्माधिकारी यांचे मार्गदर्शन घेऊन तसेच, पोलादपूरचे रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य चंद्रकांत कळंबे यांच्या विशेष सहकार्याने तयार केले.

- Advertisement -

‘या’ दरडग्रस्त गावांना ‘नारायण अ‍ॅलर्ट’ यंत्राची आवश्यकता

यंत्राला जीपीएस सिस्टिम लावण्यात आल्यामुळे संकट पूर्व सुचना आपत्कालीन विभाग, पोलीस स्टेशनमध्ये कॉल व एसएमएस संदेश देता येणे शक्य होणार आहे. जिल्ह्यातील जवळपास १०३ गावे दरडग्रस्त आहेत. यामध्ये महाड ४९, पोलादपूर १५, रोहा ३, म्हसळा ६, माणगांव ५, पनवेल ३, खालापूर ३, कर्जत ३, सुधागड ३, श्रीवर्धन २ व तळा १ अशी संख्या असून, दरडग्रस्त गावातील नागरिकांनी व तेथील लोकप्रतिनिधींनी भविष्यातील धोका लक्षात घेता सदरचे यंत्र बसविणे गरजेचे आहे.


हे ही वाचा – शिवसेना खासदार भावना गवळींच्या पाच संस्थांवर ED ची छापेमारी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -