घरमहाराष्ट्रसगळ्यांचे दिवस येतात, दिल्लीत आमचेही दिवस येतील - संजय राऊत

सगळ्यांचे दिवस येतात, दिल्लीत आमचेही दिवस येतील – संजय राऊत

Subscribe

शिवसेना आणि महाविकास आघाडीसंबंधित महत्त्वाच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया सुरु आहेत. यावरुन शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सगळ्यांचे दिवस येतात, दिल्लीत आमचेही दिवस येतील, अशा शब्दांत भाजपला इशारा दिला. केंद्रीय संस्था हातात असल्यानं अशा कारवाया केल्या जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला.

राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अ‍ॅड. अनिल परब (Anil Parab) यांना ईडीने नोटीस पाठवली तर शिवसेनेच्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांच्या ५ संस्थांवर ईडीने धाडी टाकल्या. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपला इशारा दिला. सुडाची भावना आणि बिनबुडाचं राजकारण त्यातून या कारवाया सुरु आहेत. सगळ्यांचे दिवस येतात, दिल्लीत आमचेही येतील, असा इशारा राऊत यांनी दिला.

- Advertisement -

त्या खड्यात तुम्ही देखील पडाल

शिवसेना आणि महाविकास आघाडीशी संबंधित महत्त्वाच्या नेत्यांवर गेल्या काही दिवसांपासून या कारवाया सुरु आहेत. तुमच्या हातामध्ये केंद्रीय तपास यंत्रणांची शस्त्र-अस्त्र आहेत, तुम्ही काही गोष्टी खणून काढताय, खणत रहा…पण खड्डा जो पडतोय त्यात तुम्ही देखील पडाल, असा इशारा राऊत यांनी दिला.

अनिल परब ईडी कार्यालयात दाखल होणार?

अनिल परब यांनी आज संजय राऊत यांची ‘सामना’च्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. यावर राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. अनिल परब मला नेहमीच भेटत असतात. ईडीची नोटीस आली म्हणून आमच्या चेहऱ्यावरचं हास्य कधी मावळत नाही. कर नाही तर डर कशाला. आम्ही जाऊ ना समोर. ईडीला काय धमक्या देणार नाही, असं राऊत म्हणाले. पुढे राऊत यांना अनिल परब चौकशीला जाणार का? असा प्रश्न करण्यात आला. त्यावर राऊत यांनी कॅमेरे लावून ठेवा, असा सूचक इशारा दिला. शेवटी कायदेशीर लढाई आहे. कायदेशीर लढाया त्याच पद्धतीने लढायच्या असतात. अनिल परब हे वकील आहेत त्यांना माहिती आहे काय करायचं ते, असं राऊत म्हणाले.

- Advertisement -

शिवसेना हे टार्गेट आहे

शिवसेना हे टार्गेट आहे. हे टार्गेट का केलं जात हे सर्वांना माहिती आहे. पण याचा तसूभरही परिणाम सरकारवर होणार नाही. शिवसेनेचं मनोधैर्य खचणार नाही. किंबहूना ते अधिक मजबूत होत आहे, असं राऊत म्हणाले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -