घरठाणेVideo: एकनाथ शिंदेंचेही डोळे पाणावले, निमित्त 'लोकनाथ' ध्वनीचित्रफितीच्या अनावरणाचे

Video: एकनाथ शिंदेंचेही डोळे पाणावले, निमित्त ‘लोकनाथ’ ध्वनीचित्रफितीच्या अनावरणाचे

Subscribe

'खरं सांगतो शिंदे साहेब तुमच्या सारखं कोणीही नाही', या विजू मानेंच्या कवितेत त्यांनी एकनाथ शिंदे यांचे वर्णन करत त्यांचे तोंडभरुन कौतुक केले.

Eknath Shinde Loknath :  नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा राजकीय प्रवास आता एका ‘लोकनाथ’ (Loknath) ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा राजकीय प्रवासाच्या  ध्वनीचित्रफितीचे मंगळवारी अनावरण करण्यात आले. ठाण्यात या कार्यक्रमासाठी अनेक राजकीय मंडळी आणि कलाकार उपस्थित होते. यावेळी दिग्दर्शक विजू माने यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कविता सादर केली. ही कविता ऐकून मंत्री एकनाथ शिंदे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. ‘खरं सांगतो शिंदे साहेब तुमच्या सारखं कोणीही नाही’, या विजू मानेंच्या कवितेत त्यांनी एकनाथ शिंदे यांचे वर्णन करत त्यांचे तोंडभरुन कौतुक केले.

काय होती विजू माने यांची कविता ?

‘आमचे इमले स्वप्नांचे त्यांना वास्तव विस्तव कुठले कळणार. मागे चर्चा आली साहेबांना मोठे पद मिळणार, एवढ्या वर्षांची मेहनत तुमची आता कुठे फळणार, शक्तीस्थळावर एक आनंदाश्रू ढळणार, चुकल हूकल आमच्याच चर्चा तुमच्या ध्यानी मनी ही नाही, खरं सांगतो शिंदे साहेब तुमच्या सारखं कोणीही नाही’. या ओळींवर एकनाथ शिंदे भावूक होत त्यांचे डोळे पाणावले.

- Advertisement -

लोकनाथ हे ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी लिहिलेल्या या गाण्याला प्रसिद्ध संगीतकार चिनार-महेश यांनी संगीतबद्ध केले आहे. तर प्रसिद्ध गायक शंकर महादेवन, महालक्ष्मी अय्यर आणि अवधूत गुप्ते यांनी या गीताला स्वरसाज चढवला आहे. सुप्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी आणि अभिनेत्री उर्मिला मांतोडकर यांच्या हस्ते या गीताचे आज अनावरण करण्यात आले.

- Advertisement -

अभिनेता सुनील शेट्टी याने यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांना आपण सर्वच जण एक सजग नेता म्हणून ओळखतो, माझी ओळख त्यांच्याशी तीन वर्षापूर्वी झाली. मात्र कायमच त्यांनी मला आदर आणि कुटूंबातील एका सदस्यासाठी वागणूक दिलेली आहे. आज मंचावर आल्यावर देखील त्यानी इतरांप्रमाणेच साधी खुर्ची मागवून तिच्यावर बसणे पसंत केले. सगळी प्रमुख माणसे मंचावर येऊन बसली की नाही याबद्दल ते कमालीचे दक्ष होते. आशा छोट्या छोट्या गोष्टीमधूनच मोठ्या माणसांची खरी ओळख होते. सर्वसामान्यांचे नेते असं एकनाथ शिंदे यांना का संबोधले जाते ते यावरून स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले.

अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी यावेळी बोलताना, सिनेमात जसे संवाद बोलणारे हिरो हिरॉईन असतात तसेच आपल्या आजूबाजूला लोकांची कामे करून देणारे एकनाथ शिंदे यांच्यासारखे नेते असतात त्यामुळे लोकांच्या नजरेत तेच खरे हिरो असतात. त्यांचा प्रवास साधा आणि सोपा नव्हता मात्र ज्या जिद्दीने त्यांनी तो पूर्ण केला त्यासाठी दाद द्यायलाच हवी. आज मोठमोठे प्रकल्प पूर्ण करत असताना देखील त्यांनी सर्वसामान्य लोकांशी असलेली आपली साथ सोडलेली नाही. मला त्यांच्याबद्दल सगळ्यात जास्त कौतुक वाटते ते त्यांच्या शिक्षणाच्या ध्यासाबद्दल प्रतिकूल परिस्थितीमुळे ते शिक्षण घेऊ शकले नाहीत मात्र आज एवढ्या व्यस्ततेतुन वेळ काढून त्यांनी आधी बीए केलं आणि आता ते एमए करत आहेत याबद्दल खरच मी त्यांना सलाम करते असंही त्या म्हणाल्या.

एकनाथ शिंदे काय म्हणाले ?  

या सोहळ्याला उत्तर देताना मंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले. समाजात वावरताना, मदत करताना, प्रशासनाशी संवाद साधताना, लोकांमध्ये वावरताना जमेल तेवढी खबरदारी घ्यावी लागते, कारण सत्ता,पद याचा उपयोग सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी व्हायला हवा यासाठी आपण कायम दक्ष असतो असं त्यांनी स्पष्ट केलं. मी बोलतो कमी आणि ऐकतो जास्त त्यामुळे समस्येचा मुळाशी जाऊन त्यातील सर्व बाबी समजून घेणं मला सोपं पडतं आणि त्यांची सोडवणुक करता येते. युनिफाईड डीसीपीआर तयार करण्याचा निर्णय असेल किंवा कोकणातील पूरग्रस्तांना केलेली मदत असेल किंवा धोकादायक घरात राहणाऱ्या नागरिकांसाठी तयार करण्यात आलेली क्लस्टर योजना असेल, बाळासाहेब ठाकरे समृद्धी महमार्ग असेल, किंवा मग कोरोना काळात केलेले कार्य असेल कायम सर्वसामान्य माणसाचे हित हेच माझ्या डोळ्यासमोर असते आणि त्यानुसारच मी कार्यरत राहतो असे त्यांनी स्पष्ट केले. माझ्या आयुष्यातील अवघड प्रसंगात मी आणि माझं कुटूंब कोलमडून गेलो होतो त्यावेळी दिघे साहेबानी धीर दिला म्हणून आजवरचा हा प्रवास करणे शक्य झाले. आजवर मी जो काही राजकीय प्रवास केला तो फक्त आणि फक्त दिघे साहेबांमुळेच असल्याची प्रांजळ कबुली त्यांनी दिली. आजही लोकांची सुख दुःख आपली मानून काम करत असल्याने हे प्रेम आणि आदर मिळत असल्याचे सांगत सगळ्यांचे त्यांनी सगळ्यांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले.


हेही वाचा – Oscar 2022 List of Nomination: ‘राइटिंग विथ फायर’ या भारतीय डॉक्युमेंट्रीला ऑस्करसाठी…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -