घरताज्या घडामोडीOscar 2022 List of Nomination: 'राइटिंग विथ फायर' या भारतीय डॉक्युमेंट्रीला ऑस्करसाठी...

Oscar 2022 List of Nomination: ‘राइटिंग विथ फायर’ या भारतीय डॉक्युमेंट्रीला ऑस्करसाठी नामांकन, जय भीमला वगळले, पाहा संपूर्ण यादी

Subscribe

जय भीम आणि मरक्कर हे दोन चित्रपट ऑस्करच्या यादीतून वगळण्यात आले असले तरी द रायटिंग विथ फायर ही डॉक्युमेंट्री ऑस्करमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. भारतासाठी ही फार मोठी बाब आहे.

 Oscar 2022 List of Nomination : चित्रपट क्षेत्रातील बहुमूल्य अशा ऑस्कर अवॉर्ड २०२२ची नामांकन यादी जाहीर करण्यात आली आहे. ऑस्कर २०२२च्या नॉमिनेशनची यादी tracee Ellis आणि Leslie Jordan घोषित केली. ज्यात भारतातील ‘राइटिंग विथ फायर’ (Writing with Fire)  या डॉक्युमेंट्रीला नामांकन मिळाले आहे. ऑस्कर अवॉर्डसाठी अभिनेता सूर्याचा ‘जय भीम’ हा तमिळ सिनेमा आणि मोहन लाल यांचा ‘मरक्कर: द लॉयन ऑफ द अरेबियन सी’ हे दोन भारतीय चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत होते मात्र दोन्ही चित्रपटांना ऑस्करच्या यादीतून वगळ्यात आले आहे. ९४व्या अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड साइंसेज नॉमिनेशन यादीच्या घोषणेचे लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या अधिकृत युट्यूब आणि बेवसाईटवर सुरू आहे.

- Advertisement -

जय भीम आणि मरक्कर हे दोन चित्रपट ऑस्करच्या यादीतून वगळण्यात आले असले तरी द रायटिंग विथ फायर ही डॉक्युमेंट्री ऑस्करमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. भारतासाठी ही फार मोठी बाब आहे.

 

- Advertisement -

पाहा ऑस्कर अवॉर्ड २०२२ची संपूर्ण नामांकन यादी 

बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म

एक्टर इन लिडींग रोल

 

‘राइटिंग विथ फायर’ विषयी

‘राइटिंग विथ फायर’ ही भारतीय डॉक्युमेंट्री फिल्म आहे. सुष्मित घोष आणि रिंटू थॉमस यांनी ही डॉक्युमेंट्री दिग्दर्शित केली आहे. यातील कथा ही दलित महिलांच्या नेतृत्वाखाली चालवण्यात येणाऱ्या खबर लहरिया या पत्रकाराची आहे. १४ वर्ष प्रिंट मीडियात काम केल्यानंतर स्मॉर्टफोनचा वापर करुन डिजिटल पत्रकारिता करण्यासाठी वळली आहे.

या डॉक्युमेंट्रीचे पहिला प्रिमियम हे २०२१मध्ये सनडान्स फिल्म फेस्टिव्हमध्ये झाले होते. तिथे विशेष ज्युरी पुरस्कार आणि प्रेक्षक पुरस्कार असे दोन पुरस्कार जिंकले होते. या डॉक्युमेंट्रीचे २८व्या आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि प्रेसकडूनही कौतुक करण्यात आले आहे.


हेही वाचा – Oscar 2022: ऑस्कर २०२२च्या नॉमिनेशनची आज घोषणा, ‘या’ चित्रपटांकडून भारताला अपेक्षा

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -