Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Facebook account : वय वाढवून घेतली जातेय फेसबुकची मज्जा, क्रॉस व्हेरिफीकेशन गरजेचे

Facebook account : वय वाढवून घेतली जातेय फेसबुकची मज्जा, क्रॉस व्हेरिफीकेशन गरजेचे

Subscribe

अल्पवयीन मुलही आपले अकाऊंट उघडत आहेत.

सोशल मिडीयाने सध्या अवघे विश्र्व व्यापून टाकले आहे. सोशल मिडीयाचा वापर करताना किमान वयाची १८ वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. मात्र वय वाढवून आपले फेसबुक अकाऊंट काढण्यात येत आहे. याबाबत कोणत्याही पातळीवर क्रॉस व्हेरिफिकेशन होत नसल्याने अल्पवयीन मुलही आपले अकाऊंट उघडत आहेत. त्यामुळे काही वेळेला ते स्वतः गोत्यात येतात शिवाय अन्य कोणाला तरी अडचणीच आणत असतात.

सध्या फेसबुक वापरणार्‍यांमध्ये अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांच्याकडून अनेक चुका होत असतात. चित्रपटातील दृष्य बघून ते एखाद्या मुलीला अथवा महिलेची बदनामी करुन ब्लॅकमेलींग सारखे प्रकारांना खतपाणी घालतात. आपण आपल्या मुलांना मोबाईल फोन, टॅपटॉप, इंटरेनट अशा सर्व सुख सोयी देत असतो. मात्र त्यांचा त्यांच्याकडून चांगला वापर होत आहे का याची खातरजमा पालक म्हणून किती करतो. या मोठा प्रश्न आहे. यासाठी आपले मुल दिलेल्या सुविधांचा कशा प्रकारे वापर करतो याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

- Advertisement -

फेसबुकवर अकाऊंट उघडताना आधी वैयक्तीक माहिती भरावी लागते. त्यामध्ये नावा बरोबर वयाचाही रकाना भरावा लागतो. परंतू काही जण वय कमी असताना खोटी जन्म तारीख देतात. यामध्ये कोणतेही क्रॉस व्हेरिफिकेशन होत नाही. त्यामुळे सर्रास अल्पवयीन मुल फेसबुक अकाऊंट सहजपणे उघडतात. याला आळा घालण्यासाठी आधार क्रमांकाचा पर्याय वापरल्यास बर्‍याच प्रमाणात आळा बसू शकतो.

अल्पवयीन मुलांना समज नसल्याने त्यांच्याकडून नकळत कुटूंबाची महत्वाची माहिती, फोटो शेअर करण्याचे प्रकार घडू शकतात. त्यामुळे याचा गैरफायदा घेण्याची शक्यता असते. त्यामुळे पालकांनी अधिक सजग राहीले पाहीजे.

- Advertisement -

आपले मुल जेव्हा मोबईल, लॅपटॉप, इंटरनेट याचा वापर करत असताना तो त्याचा कशा प्रकारे वापर करत आहे. यावर पालकांनी लक्ष ठेवले पाहीजे. अभ्यासापुरताच त्याचा वापर कसा होईल हेही पाहणे गरजेचे आहे.

फेसबुकवर माहिती भरताना ती खरी आहे. याबाबत कोणतेच व्हेरिफिकेशन होत नाही. त्यामुळे वय वाढवून अल्पवयीन मुल खाते अघडतात. याबाबत पालकांनी आपल्या पाल्याबाबत अधिक दक्ष राहीले पाहीजे. इंटरनेट, मोबाईल वापराताना त्याचा गैरवापर होत नाही ना यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. त्यांच्याकडून होणारी गंभीर चुक मोठ्या गुन्ह्याला निमंत्रण देऊ शकते.

-सायबर सेल

 

वार्ताहर – रत्नाकर पाटील


हे ही वाचा – pune unlock : पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रम, आठवडी बाजारास परवानगी, उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश


 

- Advertisment -