घरताज्या घडामोडीफणसाड अभयारण्याचे संवर्धन झाले पाहिजे - गार्गी गीध

फणसाड अभयारण्याचे संवर्धन झाले पाहिजे – गार्गी गीध

Subscribe

वैश्विक तापमानामुळे वन्य जीवांवर परिणाम

फणसाड अभयारण्य हे महाराष्ट्रातील समुद्राच्या जवळ असलेले एकमेव असून, जैवविविधता येथे मोठ्या प्रमाणावर आढळून येते. त्यामुळे या अभयारण्याचे संरक्षण आणि संवर्धन झाले पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन ग्रीन वर्क्स ट्रस्टच्या सदस्या गार्गी गीध यांनी केले. फणसाड वन्यजीव विभाग आणि प्रादेशिक वन विभाग यांचे संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताहाच्या समारोपप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. महिला बचत गट आणि वन विभागाच्या कर्मचार्‍यांना सोलर लँपचे वाटपही त्यांनी केले. यावेळी अभयारण्याचे वन परिक्षेत्र अधिकारी राजवर्धन भोसले, प्रादेशिक वन परिक्षेत्र अधिकारी प्रशांत पाटील, ग्रीन वर्क्स ट्रस्टचे कुणाल साळुंखे, अमोल देशपांडे, प्रणव बागवे, पक्षीमित्र अविनाश भगत, सर्पमित्र संदीप घरत, निवृत्त सहाय्यक वनरक्षक केसरीनाथ गोडबोले, लेखापाल विकास करंगळे, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत सुर्वे, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी राजवर्धन भोसले यांनी अभयाराण्यातील विविध योजनांची माहिती दिली. साळुंखे यांनी आपल्या भाषणात वैश्विक तापमानामुळे वन्य जीवांवर होणारे परिणाम विशद करून आपत्ती व्यवस्थापनाने याकडे लक्ष देण्याचे सूचित केले. तर गोडबोले म्हणाले की, लोकसंख्येचे नियमन केले पाहिजे तरच पर्यावरणाचा समतोल राखला जाईल.

- Advertisement -

बागवे यांनी फणसाड येथील प्राण्यांची विस्तृत माहिती देतांना धनेश, बिबट्या, बेडूक तोंड्या, खवले मांजर, मोठी खार (शेकरू), रानकुत्रा आणि रानगव्यांचा अधिवास असल्याने अभयारण्याची जैव समृद्धी वृद्धिंगत होत असल्याचे सांगितले. अरुण पाटील, गोविंदा माळी, भाई दिघे आदींनी आपले विचार व्यक्त करताना वन्यजीव संवर्धनासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन ज्ञानदेव सुभेदार, तर आभार प्रदर्शन सुनील जाधव यांनी केले.


हे ही वाचा – मावळमध्ये नेत्याच्या मुलाने गोळीबार केला नव्हता, जितेंद्र आव्हाडांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -