घरताज्या घडामोडीRussia Ukraine War: युद्ध थांबवण्यासाठी फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांच्याशी ९० मिनिटातील चर्चेत...

Russia Ukraine War: युद्ध थांबवण्यासाठी फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांच्याशी ९० मिनिटातील चर्चेत पुतिन यांनी ठेवली ‘ही’ अट

Subscribe

रशिया-युक्रेन युद्ध रोखण्यासाठी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी गुरुवारी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत ९० मिनिटे पुन्हा एकदा चर्चा केली. याबाबतची माहिती एएफपी वृत्तसंस्थेनी दिली आहे. या चर्चेदरम्यान व्लादिमीर पुतिन मॅक्रॉन यांना म्हणाले की, ‘युक्रेनमधील रशियाच्या मोहिमेचे लक्ष्य युक्रेनचे निशस्त्रीकरण आणि तटस्थ स्थिती कोणत्याही प्रकारे साध्य केली जाईल.’ क्रेमलिनने ही माहिती दिली. तसेच पुतिन म्हणाले की, ‘किवद्वारे चर्चेला उशीर करण्याचा कोणताही प्रयत्न केला तर मॉस्को आपल्या मागण्यांच्या यादीत आणखीन आयटम जोडेल.’

- Advertisement -

दरम्यान यापूर्वी मॅक्रॉन यांनी पुतिन यांच्यासोबत २८ फेब्रुवारीला बातचित केली होती. युक्रेनमधील नागरिकांवर होणारे सर्व हल्ले रोखावेत, नागरी पायाभूत सुविधांचे रक्षण करावे आणि मुख्य रस्त्यांवर सुरक्षित प्रवेश करावा, असे आवाहन फ्रान्स राष्ट्रपतींनी पुतिन यांना केले होते.

पुतिन फ्रान्सच्या राष्ट्रपतींना म्हणाले होते की, रशिया युक्रेनच्या प्रतिनिधींसोबत बातचित करण्यासाठी तयार आहे आणि मॉस्कोला आशा आहे की, याचे चांगले परिणाम होतील. तसेच रशियाच्या राष्ट्रपतींनी या गोष्टीवर जोर दिला की, रशिया सशस्त्र दलातील नागरिकांना धमकी देत नाही आणि कोणत्याही नागरिकांच्या प्रतिष्ठेवर हल्ला करत आहे.

- Advertisement -

रशिया आणि युक्रेनच्या युद्धादरम्यान रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या सैन्याला मोठा झटका बसला आहे. रशियाचे मेजर जनरल रँकचे अधिकारी आंद्रेई सुखोवेत्स्की यांचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – Russia Ukraine war: ऑपरेशन गंगाद्वारे युक्रेनमधून १८ हजार भारतीय मायदेशी परतले; अजूनही खारकीवमध्ये अडकलेत भारतीय


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -