घरताज्या घडामोडीRussia Ukraine war: ऑपरेशन गंगाद्वारे युक्रेनमधून १८ हजार भारतीय मायदेशी परतले; अजूनही...

Russia Ukraine war: ऑपरेशन गंगाद्वारे युक्रेनमधून १८ हजार भारतीय मायदेशी परतले; अजूनही खारकीवमध्ये अडकलेत भारतीय

Subscribe

रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनमधील अनेक शहरं रिकामी केली जात आहेत. यादरम्यान बरेच भारतीय विद्यार्थी आणि लोकं युक्रेनच्या वेगवेगळ्या भागात अडकले असून सरकारच्या मदतीची वाट पाहत आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या या लोकांबाबत आता परराष्ट्र मंत्रालयाने पुन्हा एक नवी माहिती दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, ऑपरेशन गंगाच्या माध्यमातून आतापर्यंत १८ हजार भारतीयांना युक्रेनमधून सुरक्षित बाहेर काढले आहे.

- Advertisement -

पुढे अरिंदम बागची म्हणाले की, गेल्या २४ तासांत १५ विमाने भारतात आली आहेत. पुढील २४ तासांत १८ विमानांना युक्रेनमध्ये पाठवले जाईल. यामध्ये ३ विमानं भारतीय हवाई दलाचे C-17 आहेत. उर्वरित या कमर्शियल विमानं आहेत. ज्यामध्ये एअर इंडिया, ईंडिगो, स्पाइस जेट, गो एअर आणि गो फर्स्टची विमानं आहेत. आम्ही सर्व भारतीय नागरिकांना लवकरात लवकर मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत.

दरम्यान जरी भारत सरकारने हजारो भारतीयांना मायदेशी आणले असले तरीही अजूनही मोठ्या प्रमाणात भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगितले आले की, सुरुवातीला २० हजार भारतीय नागरिकांची नोंद केली गेली होती. परंतु बरेच असे आहेत, ज्यांनी नोंद केली नव्हती. आमचा अंदाज असा आहे की, अजूनही शंभर भारतीय नागरिक खारकिवमध्ये आहेत. आमचे प्राधान्य विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढणे आहे.

- Advertisement -

अरिंदम बागची म्हणाले की, आम्ही अजूनही विमानांची उड्डाणे शेड्यूल करत आहोत. आगामी दोन ते तीन दिवसांत मोठ्या संख्येत भारतीय परत येतील. आपल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी होस्टिंग आणि मदत पुरवल्याबद्दल मी युक्रेन सरकार आणि शेजारील देशांचे कौतुक करू इच्छितो.


हेही वाचा – Russia-Ukraine War: पुतिनच्या सैन्याला मोठा धक्का; युक्रेन युद्धात रशियाच्या मेजर जनरलचा मृत्यू


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -