घररायगडरोहे शहर येणार सीसीटीव्ही कॅमेरांच्या नजरेत, रोठखुर्द ते किल्ला मार्गावरही बसवणार कॅमेरे

रोहे शहर येणार सीसीटीव्ही कॅमेरांच्या नजरेत, रोठखुर्द ते किल्ला मार्गावरही बसवणार कॅमेरे

Subscribe

रोहे शहरात रोहे अष्टमी नगरपरिषदेच्यावतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. परंतु काही कालावधीनंतर कॅमेरा नादुरुस्त झाले होते.तर दुसरीकडे सर्वच भाग सीसीटीव्ही कॅमेराच्या नजरेत येत नव्हते

शहरात गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावी व शहरावर नजर रहावी या दृष्टिकोनातून रोहा शहरात लवकरच ३२ सीसीटिव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात येणार आहेत. त्यामुळे संपुर्ण रोहे शहरावर सीसीटीव्ही कॅमेरांची करडी नजर असणार आहे. तर दुसरीकडे रोहे कोलाड मार्गावर रोठखुर्द ते किल्ला पर्यंत रोहे इंडस्ट्रीज असोसिएशन यांच्या माध्यमातून सीसीटिव्ही कॅमेरा बसविण्यात येणार असल्याने या मार्गावरही कॅमेरांची करडी नजर असणार आहे.

रोहे शहरात रोहे अष्टमी नगरपरिषदेच्यावतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. परंतु काही कालावधीनंतर कॅमेरा नादुरुस्त झाले होते.तर दुसरीकडे सर्वच भाग सीसीटीव्ही कॅमेराच्या नजरेत येत नव्हते.परंतु रोहे अष्टमी नगरपरिषद व रोहे पोलिस ठाण्याच्या नियोजनामुळे रोहे शहरातील नादुरुस्त १६ सीसीटीव्ही कॅमेरांची दुरुस्ती होणार आहेत. त्याच बरोबर रोहे शहरात श्री धाविर महाराज पालखी मार्गावर १६ नवीन सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात येणार असल्याने संपूर्ण शहरावर सीसीटीव्ही कॅमेरांची करडी नजर असणार आहे. या कॅमेराचे नियंत्रण रोहे पोलिस ठाण्यात असणार आहे. त्यामुळे कोणत्या भागात काय चालू आहे पोलिसांना कळणार आहे.

- Advertisement -

रोहे – कोलाड मार्गावर नेहमीच वर्दळ असते. या मार्गावर औद्योगिक क्षेत्रातच्या हद्दीत सीसीटीव्ही कॅमेरांची आवश्यकता होती. ही गरज ओळखून रोहे इंडस्ट्रियल असोसिएशनच्यावतीने रोठखुर्द ते किल्ला दरम्यान ३५ सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे या मार्गावरही करडी नजर असणार आहे. याचे मॉनिटरिंग रोहे इंडस्ट्रियल असोसिएशनच्या कार्यालयातून होणार आहे. तर दुसरीकडे औद्योगिक क्षेत्रात ही सीसीटीव्ही असणार आहेत.

बँका, धार्मिक स्थळे, दुकानदार, व्यापारी, हॉटेल, सोसायटी यांनी आपल्याकडे असलेले सीसीटीव्ही कॅमेरे लगत असलेले रस्ते कव्हर होतील असा पद्धतीने बसवावेत.
– संजय पाटील, निरीक्षक, रोहा पोलीस स्थानक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -