घरताज्या घडामोडीBJP : मिरा-भाईंदरमध्ये भाजपच्या दोन गटात तुफान हाणामारी

BJP : मिरा-भाईंदरमध्ये भाजपच्या दोन गटात तुफान हाणामारी

Subscribe

येत्या काळातील लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचार संहिता काळात राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे, त्याच अनुषंगाने भाजप प्रभारी जे.पी. ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा यांनी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते, त्यात मेहता व रवी व्यास अश्या दोन गटात तुफान हाणामारी झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शिमग्या आधीच मीरा भाईंदर भाजपा मध्ये बोंबाबोंब सुरू झाली. यात दोन गटात मध्यस्थी करणाऱ्या भाजप जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा यांनाही चांगलाच प्रसाद मिळाला असल्याचे व्हायरल व्हिडीओत दिसत आहे.

भाईंदर : येत्या काळातील लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचार संहिता काळात राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे, त्याच अनुषंगाने भाजप प्रभारी जे.पी. ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा यांनी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते, त्यात मेहता व रवी व्यास अश्या दोन गटात तुफान हाणामारी झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शिमग्या आधीच मीरा भाईंदर भाजपा मध्ये बोंबाबोंब सुरू झाली. यात दोन गटात मध्यस्थी करणाऱ्या भाजप जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा यांनाही चांगलाच प्रसाद मिळाला असल्याचे व्हायरल व्हिडीओत दिसत आहे. तर शहरात भाजपचे मागच्या पाच वर्षांपासून दोन गट कार्यरत असून ते सतत एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यात मीरा भाईंदर प्रभारी हे सातत्याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत असतात तो वाद मात्र आता शिमग्या आधीच शिगेला पोहोचला आहे. (Two factions of BJP clashed in Mira Bhayander)

येत्या काही दिवसांवर येऊन ठपलेल्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मीरा भाईंदर मधील भाजप पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक प्रदेश गुरुवारी कार्यकारणीने बोलावली होती. या बैठकीला मिरा भाईंदर भाजपचे प्रभारी जे. पी. ठाकूर उपस्थितीत राहणार होते. सदर बैठक हि गुरुवारी संध्याकाळी मिरारोडच्या जुना गोल्डन नेस्ट येथील ब्लु-मुन क्लब येथे ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत माजी आमदार नरेंद्र मेहता व रवी व्यास यांच्या गटातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

- Advertisement -

या कार्यक्रमाच्या वेळी मीरा भाईंदर विधानसभा प्रमुख ऍड. रवी व्यास यांना सन्मान न देता डावलल्याने त्यांचे समर्थक काही प्रमाणात संतप्त झाले होते. काही वेळाने हे संतप्त कार्यकर्ते थेट मंचावर चढले. हे पाहून नरेंद्र मेहता समर्थक देखील आक्रमक झाले. सुरुवातीला शाब्दिक वादाने सुरु झालेल्या हा वाद काही क्षणातच मोठ्या प्रमाणात हाणामारीत रूपांतरित झाला. त्यामुळे भाजप जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावेळी दोन्ही गटाच्या भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा यांना देखील मारहाण करत सदरील कार्यक्रमाचा प्रसाद दिला. यामुळे दोन्ही गटातील वाद शिकोपाला पोहोचत चिघळला गेला आणि त्यातच तुफान हाणामारी सुरू झाली. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची चित्रफित समाज माध्यमावर व्हायरल झाली आहे. या प्रकारामुळे मीरा भाईंदरच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण येऊन भाजपचे शिस्तबद्ध संस्कार दाखविणारे मारामारीच्या व्हिडीओतुन दिसून आले आहे.

मेहता व व्यासला आमदारकीचे डोहाळे

मीरा भाईंदर विधानसभा मतदार संघ डोळ्यासमोर ठेवून येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे तिकीट भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता व भाजपचेच माजी जिल्हाध्यक्ष तथा विधानसभा प्रमुख ऍड. रवी व्यास यांना लोकसभे नंतर होणाऱ्या विधानसभेत भाजपाचे तिकीट मिळण्याचे डोहाळे लागल्याने चढाओढ सुरू झाली आहे. तर मेहता आणि व्यास हे दोघे देखील आगामी विधानसभा निवडणूक भाजप पक्षातून लढण्यास इच्छुक आहेत. यात मेहता व व्यास यांच्या पाठीमागे त्यांच्या त्यांच्या माजी नगरसेवक समर्थकांची फौज उभी आहे. तसेच किशोर शर्मा हे मेहता यांच्या पाठीशी असून ते मेहतांच्या नेतृत्वाखाली काम करतात असा देखील आरोप होतो. तसेच जिल्हाध्यक्ष हे व्यास गटाला पदाधिकारी पदांच्या नियुक्ता देताना कमी लेखण्याचे करतात असाही आरोप झालेला आहे. तर व्यास यांनी देखील मध्यल्या काळात काही नगरसेवकांचा आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळवून आपली ताकद मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे. यामुळे भाजपच्या गटात तू की मी मोठा यावरून सध्या सुरू आहे.

- Advertisement -

हेही वाचा – डहाणू पंचायत समितीची धोकादायक इमारत रिकामी करण्याचा निर्णय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -