घरक्राइमAshwini Bindre Murder Case : एकनाथ खडसेंच्या भाच्याचा जामीन तिसर्‍यांदा नाकारला

Ashwini Bindre Murder Case : एकनाथ खडसेंच्या भाच्याचा जामीन तिसर्‍यांदा नाकारला

Subscribe

सहाय्यक पोलीस अधिकारी अश्विनी बिंद्रे हत्याकांडातील आरोपी तसेच माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजू पाटील उर्फ ज्ञानदेव पाटील याचा मुंबई उच्च न्यायालयाने तिसर्‍यांदा जामीन अर्ज फेटाळला आहे.

नवी मुंबई : सहाय्यक पोलीस अधिकारी अश्विनी बिंद्रे हत्याकांडातील आरोपी तसेच माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजू पाटील उर्फ ज्ञानदेव पाटील याचा मुंबई उच्च न्यायालयाने तिसर्‍यांदा जामीन अर्ज फेटाळला आहे. जामीन अर्ज फेटाळण्याबरोबरच पनवेल न्यायालयाने येत्या 31 ऑगस्ट 2024 पूर्वी हा खटला संपून निकाल द्यावा, असे आदेश राजू पाटील याच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांनी दिले आहेत. (Ashwini Bindre murder accused Raju Patil bail plea rejected by Bombay High Court for the third time)

अश्विनी बिंद्रे हत्याकांड प्रकरणाचा खटला पनवेलचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार यांच्या न्यायालयात सुरू आहे. या हत्याकांडात माजी मंत्री खडसे यांचा भाचा राजू पाटील याचा बिंद्रे हत्याकाडांत सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आतापर्यंत या खटल्यात 75 जणांसह शेवटचे साक्षीदार सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता शिंदे-अल्फान्सो यांची साक्ष घेण्यात आली आहे. त्यामुळे हा खटला आता अंतिम टप्प्यात आला आहे. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत आणि आरोपी राजू पाटीलचे वकील प्रसाद पाटील यांचा आतापर्यंत युक्तीवाद केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अविनाश जाधवांच्या अडचणीत वाढ; पोलिसांसमोर मारहाण करणारा व्हिडीओ आला समोर

दरम्यान या प्रकरणात अटकेत असलेला आरोपी माजी मंत्री खडसे यांचा भाचा राजू पाटील याने पहिल्यांदा जामीन अर्ज 2018 मध्ये दाखल केला होता. न्यायमूर्ती अनुजा प्रभू-देसाई यांनी आरोपीचा यात सहभाग असल्याने 28 सप्टेंबर 2018 रोजी जामीन अर्ज रद्द केला होता. त्यानंतर पुन्हा दुसर्‍यांदा 2021 मध्ये राजू पाटील याने जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावेळी देखील पाटील याचा जामीन अर्ज रद्द केल्यास खटल्यावर परिणाम होऊ शकतो असे सांगत जामीन नाकारला होता. सदरची सुनावणी पनवेल येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात न्यायमूर्ती के. जी. पालदेवार यांच्या न्यायालयात सुरू आहे. आपल्याला जामीन मिळावा यासाठी राजू पाटील याने खटल्याची सुनवणी सुरू नाही, विनाकारण आम्हाला जेलमध्ये ठेवले आहे. त्यामुळे जामीन मिळावा म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या न्यायालयात तिसर्‍यांदा अर्ज दाखल केला होता. मात्र तो अर्ज देखील फेटाळून लावला आहे.

- Advertisement -

न्यायमूर्ती माधव जामदार यांनी सरकार वकील प्रदीप घरत यांनी मांडलेला युक्तीवाद ग्राह्य धरला आहे. घरत यांनी न्यायालया समोर खटल्याची पार्श्वभूमी, आतापर्यंत तपासलेले साक्षीदार आणि सध्या कोर्टासमोर आरोपींची 313ची स्टेटमेंट (साक्ष नोंदणी) सुरू असल्याचे मांडले. सदरचा खटला 31 ऑगस्ट 2024 पुर्वी न्यायमूर्ती के. जी. पालदेवार (अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पनवेल-रायगड) यांनी संपवून निकाल द्यावा, त्याचप्रमाणे जर 31 ऑगस्ट 2024 पर्यंत निकाल नाही लागला तर नव्याने जामीन अर्ज दाखल करा, असेही आदेशात नमूद केले आहे.

हेही वाचा – Patra Chawl Scam : संजय राऊतांकडून स्वप्ना पाटकरचा छळ सुरू; नीलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं निवेदन

दरम्यान, अश्विनी बिंद्रे हत्येप्रकरणी सरकारी वकीलांकडून आतापर्यंत केलेल्या युक्तीवादामुळे यात सहभागी असणारे सर्व आरोपींची साक्ष नोंदविण्यात आली आहे. राजू पाटील याने केलेला तिसरा जामीन अर्ज फेटाळला आहे. या प्रकरणी लवकरात लवकर निर्णय देऊन अश्विनी बिंद्रेंच्या परिवाराला न्याय द्यावा, अशी मागणी अश्विनी बिंद्रे यांचे पती राजू गोरे यांनी केली आहे.

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -