घरक्राइमCrime : प्रेयसीची हत्या करत स्वत:ला संपवले, मात्र पोलीस अडकले सांकेतिक क्रमांकात

Crime : प्रेयसीची हत्या करत स्वत:ला संपवले, मात्र पोलीस अडकले सांकेतिक क्रमांकात

Subscribe

नवी मुंबई : सानपाडा स्थानकाजवळ एका तरुणाने 12 डिसेंबर 2023 रोजी रेल्वेतून उडी मारून आत्महत्या केली होती. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी प्रेयसीची जिप साखळीने गळा आवळून हत्या केली होती.  पोलिसांना त्याच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या सुसाईड नोटवरून नवी मुंबई पोलिसांना यासंबंधीत माहिती मिळाली. मात्र मुलीचा मृतदेह कुठे फेकला याचा सुगावा सुसाईड नोटमधील L01–501 या सांकेतिक क्रमांकात दडला होता. एका महिन्याभरानंतर वनविभागाच्या मदतीने अखेर पोलिसांनी मुलीचा मृतदेह सापडला.  (Crime He killed his girlfriend but the police got caught in the code number)

हेही वाचा – Maharashtra Politics : उत्तर द्या! आमदार अपात्रतेच्या निकालानंतर ठाकरे गटाकडून नवी मोहीम

- Advertisement -

12 डिसेंबर रोजीच एका कुटुंबाने नवी मुंबई पोलिसांना त्यांची 19 वर्षीय मुलगी वैष्णवी बाबर बेपत्ता झाल्याची माहिती दिली. ती बारावीत शिकत होती. तसेच तिचे 24 वर्षीय मृत वैभव वरुंगले यांच्यासोबत प्रेमप्रकरण असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर पोलिसांनी तपास केला असता त्यांना समजले की, दोघांच्या जाती वेगळ्या होत्या. घरच्यांच्या दबावामुळे वैष्णवीने दोघांमधील नाते संपवण्याचा निर्णय घेतला होता. ती वैभवपासून लांब राहू लागली. अशातच वैष्णवीचे कुटुंबीय तिच्यासाठी मुलगा शोधत असल्याचे वैभवला समजले. त्यामुळे त्याने शेवटची भेट घेण्याच्या बहाण्याने वैष्णवीला खारघरच्या डोंगराळ भागात बोलावले, त्यानंतर जीपच्या साखळीने तिची गळा आवळून हत्या केली. वैभवने आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले की, वैष्णवीला जास्त त्रास होऊ नये, म्हणून तिची गळा दाबून हत्या करण्यापूर्वी जीपच्या साखळीने स्वत:चा गळा आवळला होता. तसेच त्याने शेवटी लिहिले की, आता पुढच्या आयुष्यात आपण एकत्र राहू.

L01–501 डीकोड करण्यासाठी पोलिसांना लागला एक महिना

वैष्णवी आणि वैभवची प्रेमप्रकरण असल्याचे पोलिसांना समजले, तसेच वैभवने आत्महत्येपूर्वी वैष्णवीची हत्या कशी केली, याचाही खुलासा वैभवच्या सुसाईड नोटमधून झाला होता. मात्र वैभवने L01–501 याठिकाणी वैष्णवीचा मृतदेह असल्याचे लिहिले होते. त्यामुळे वैष्णवीचा मृतदेह नेमका कुठे आहे, असा प्रश्न पोलिसांनी पडला होता. यासाठी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी डीसीपी अमित काळे यांच्या नेतृत्वाखाली विशेष टास्क फोर्सची स्थापना केली होती. कॉल रेकॉर्ड आणि तांत्रिक तपासात 12 डिसेंबर रोजी दोघेही खारघर टेकडी परिसरात गेल्याचे उघड झाले. त्यानुसार पोलिसांनी मृतदेह शोधण्यासाठी खारघर परिसरात शोधाशोध सुरू केली. नवी मुंबई पोलिसांच्या मानवी तस्करी प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ निरीक्षक अतुल आहेर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने परिसराच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला. तसेच अग्निशमन दल, वनविभाग, सिडको यांचीही मदत घेतली. मृतदेहाच्या शोधासाठी ड्रोनही उडवण्यात आले, मात्र वैष्णवीचा मृतदेह काही सापडला नाही.

- Advertisement -

हेही वाचा – Aaditya Thackeray : सूरज चव्हाण यांच्या अटकेनंतर आदित्य ठाकरेंची पोस्ट चर्चेत; ‘अशा देशभक्तांचा…’

वनविभागाच्या मदतीने सापडला वैष्णवीचा मृतदेह

वैष्णवीचा मृतदेह शोधण्यासाठी तपास पथक गुगलवर L01–501 लोकेशन शोधत होते. सांकेतिक क्रमांक शोधण्यासाठी अनेक कॉम्बिनेशन करण्यात आले, मात्र काहीच सुगावा लागत नव्हता. अखेर वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलून पोलिसांना यश आले. वृक्षगणनेसाठी असे कोड ठेवलेले असतात, असे वनविभागाने सांगितले. L01–501 कोड देखील काही झाडांना किंवा इतरांना दिलेला असावा, असे वनविभागाने सांगतिले. यानंतर वनविभागाने नोंदी शोधल्या असता खारघरपासून सहा किमी अंतरावर असलेल्या कळंबोली परिसरात हा कोड देण्यात आल्याचे समजले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले असता वैष्णवी बाबरचा मृतदेह झुडपात पडलेला आढळून आला. महिनाभरात तिचा चेहरा आणि शरीर कुरूप झाले होते. कपडे, घड्याळ आणि ओळखपत्राच्या आधारे कुटुंबीयांनी वैष्णवीची ओळख पटवली, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक अतुल आहेर यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -