घरमहाराष्ट्रMaharashtra Politics : उत्तर द्या! आमदार अपात्रतेच्या निकालानंतर ठाकरे गटाकडून नवी मोहीम

Maharashtra Politics : उत्तर द्या! आमदार अपात्रतेच्या निकालानंतर ठाकरे गटाकडून नवी मोहीम

Subscribe

मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालानंतर 16 जानेवारी रोजी ठाकरे गटाकडून महापत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत जुने व्हिडीओ दाखवत ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर पुराव्यासह जोरदार हल्ला करण्यात आला. यानंतर आता ठाकरे गटाने उत्तर द्या! असे म्हणत नवी मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून ठाकरे गटाने भाजपा, निवडणूक आयोग आणि एकनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. (Maharashtra Politics Answer New campaign from Thackeray group after MLA disqualification result)

हेही वाचा – Aaditya Thackeray : सूरज चव्हाण यांच्या अटकेनंतर आदित्य ठाकरेंची पोस्ट चर्चेत; ‘अशा देशभक्तांचा…’

- Advertisement -

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट करत ठाकरे गटाने म्हटले की, उद्धव ठाकरे जर पक्षप्रमुख किंवा पक्षाध्यक्ष नव्हते, तर भाजपाने 2014 लोकसभा आणि 2019 च्या दोन्ही निवडणूकांमध्ये पाठींबा का मागितला? अशा आशयाचे ट्वीट करत एक बॅनर पोस्ट केला आहे. त्यात म्हटले की, उद्धव ठाकरे पक्षाध्यक्ष नव्हते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्याशी चर्चा का करीत होते? उद्धव ठाकरेंच्या पाठिंब्याचे पत्र राष्ट्रपतींना कसे दिले गेले? उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांना दिलेले एबी अर्ज केंद्रीय निवडणूक आयोगाने कसे स्वीकारले? शिंदेसह अन्य नेत्यांनी उद्धव ठाकरे यांनी दिलेली पदे कशी स्वीकारली? असा प्रश्नांचा भडीमार केला आहे.

हेही वाचा – Ram Temple : प्राणप्रतिष्ठेपूर्वी यूपी एटीएसचा अयोध्येला वेढा; 360 डिग्री सुरक्षेसाठी ड्रोन तैनात

- Advertisement -

महापत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?

आमदार अपात्रता निकालाविरोधात ठाकरे गटाने मंगळवारी सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, एन.एस.सी.आय वरळी-मुंबई येथे महापत्रकार परिषद घेत जुन्या व्हिडीओच्या माध्यमातून पुरावे सादर केले होते. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, समजा 1999 ला असलेली आमची घटना शेवटची होती, मग 2014 साली मोदींना पाठिंबा द्यायला मला का बोलावलं होतं? 2019 साली का बोलावले होते? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला होता. मोदीजी म्हणाले होते की, आता बाळासाहेब राहिले नाहीत, मला सल्ला घ्यायचा असेल तर मी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करतो, ते काय होतं? माझं नेतृत्व मान्य नव्हतं तर अमित शहा मातोश्रीवर का येत होते? पाच वर्ष देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पद उबवलं ते कोणाच्या जोरावर? त्या मिंध्याबिंध्यांना पद, एबी फॉर्म, मंत्रीपद मीच दिली होती की नाही? असा प्रश्नांचा भडीमार उद्धव ठाकरे यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -