घरक्राइमPolice & Crime : पोलीस कर्मचाऱ्यानेच केली चोरी अन् तीसुद्धा स्टेशनमध्ये! कुठे...

Police & Crime : पोलीस कर्मचाऱ्यानेच केली चोरी अन् तीसुद्धा स्टेशनमध्ये! कुठे घडला प्रकार?

Subscribe

छत्रपती संभाजीनगररमधील छावणी पोलीस स्टेशन नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असते. याच पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्याने चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. राजेंद्र नारायण होळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सहाय्यक फौजदार रामदास संताराम गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर : समाजातील गुन्हेगारी रोखण्याचं काम पोलिसांवर असते. परंतु हेच पोलीस जर गुन्ह्यात सहभागी होत असतील तर! आश्चर्य वाटलं ना? हो पण हे खरं आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एका पोलीस कर्मचाऱ्याने त्याच्याच पोलीस स्टेशनमध्ये चोरी केल्याचा प्रकार उघडकीसा आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षकांच्या फिर्यादीवरून सहाय्यक फौजदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Police & Crime The policeman himself committed the theft in the third station Where did it happen)

तीन लाखाची रक्कम परस्पर घेतली काढून

छत्रपती संभाजीनगररमधील छावणी पोलीस स्टेशन नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असते. याच पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्याने चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. राजेंद्र नारायण होळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सहाय्यक फौजदार रामदास संताराम गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

होळकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, रामदास गायकवाड हे पोलीस स्टेशन छावणीमध्ये नेमणुकीस असून, पोलीस ठाण्यातील मोहरील ड्युटी करीत असतात. दरम्यान, मोहरील पदाचा गैरवापर करुन तत्कालीन पोलीस निरीक्षक यांचा विश्वास संपादन करुन 30 एप्रिल 2021 रोजी 3 लाख 4 हजार 819 रुपये शासकीय बँक खात्यामधून रोखीने काढून घेतले. त्याची शासकीय अभिलेखावर नोंद न घेता त्या रक्कमेचा हिशोब ठेवला नाही असेही त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचा : Chanakya Niti : यशस्वी व्हायचंय? मग वापरा ‘ही’ चाणक्य निती

- Advertisement -

गायकवाड यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

पोलीस निरीक्षक होळकर यांच्या फिर्यादीत नमूद आहे की, गायकवाड यांनी शासकीय अभिलेखामध्ये ओव्हर रायटिंग करुन शासनाची दिशाभूल करुन फसवणुक केली. या रक्कमेची स्वत:च्या फायद्यासाठी वापरुन नमुद रकमेचा अपहार केला. त्यामुळे त्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आले आहे. या प्रकारामुळे पोलीस विभागात चर्चेला उधाण आले आहे.

हेही वाचा : Ashish Shelar : हिम्मत असेल तर द्या राजीनामा अन् या वरळीत…; शेलारांचं आदित्य ठाकरेंना आव्हान

असा आला प्रकार उघडकीस

पोलीस ठाण्यात मोहरी फंडाचा वापर पोलीस ठाण्याचा वेगवेगळ्या कामासाठी, लाइट बिलसाठी केला जातो. छावणी पोलीस ठाण्यातील मोहरील ड्युटीवर गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली होती. नवनियुक्त पोलिस निरीक्षक होळकर यांनी वार्षिक अहवाल तपासला असता त्यांना त्यामध्ये अनियमितता आढळून आली. त्यांनी अधिक माहिती घेतली असता 3 लाख 4 हजार 819 रुपये शासकीय बँक खात्यामधून रोखीने काढून तो कुठे वापरण्यात आला याची महिती उपलब्ध नव्हती. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -