घरक्राइमPune Crime: पुणे पोलिसांकडून आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त; छापेमारीत 4 हजार कोटींचे...

Pune Crime: पुणे पोलिसांकडून आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त; छापेमारीत 4 हजार कोटींचे अमली पदार्थ जप्त

Subscribe

पुण्यातील ड्रग्ज विक्रीचे दिल्ली कनेक्शन समोर आलं आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने इतिहासातील सगळ्यात मोठी कारवाई करत मंगळवारी (20 फेब्रुवारी) दिल्लीतून तब्बल 800 कोटींचं ड्रग्ज जप्त केले आहेत.

पुणे: पुण्यातील ड्रग्ज विक्रीचे दिल्ली कनेक्शन समोर आलं आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने इतिहासातील सगळ्यात मोठी कारवाई करत मंगळवारी (20 फेब्रुवारी) दिल्लीतून तब्बल 800 कोटींचं ड्रग्ज जप्त केले आहेत. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने काही तस्करांना अटकदेखील केली आहे. पुण्यात इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा पुरवठा होत असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. (Pune Crime International drug racket busted by Pune police Drugs worth 4 thousand crores seized in the raid)

पुण्यातील 2000 किलो ड्रग्ज प्रकरणी मास्टरमाईंडचा शोध सुरू झाला आहे. सॅम ब्राऊन या नावाने फिरणाऱ्या परदेशी नागरिकाचा पुणे पोलीस सध्या शोध घेत आहेत. पुण्यातील ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींना 2000 किलो एमडी ड्रग्ज बनवण्याचं टार्गेट देण्यात आलं होतं. पुण्यातील ड्रग्जप्रकरणात आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात अटकेत असलेला युवराज भुजबळ याला पुणे पोलिसांनी डोंबिवलीतून अटक केली आहे. या प्रकरणातील मास्टरमाईंडने भुजबळला ड्रग्ज बनवण्याचा फॉर्म्युला दिला होता, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

भीमाजी उर्फ अनिल साबळे आणि युवराज भुजबळने कुरकुंभ येथे एमडी ड्रग्जचा कारखाना सुरू केला होता. तर ललित पाटील प्रकरणात आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कुरकुंभ परिसरात आणखी एक ड्रग्जचा कारखाना सुरू असल्याचं पोलिसांना आढळलं. पोलिसांचा हा तपास केवळ पुण्यापुरता मर्यादीत न राहता तो दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल 800 कोटी रुपये किमतीचे 400 किलो एमडी ड्रग्ज जप्त केले. पुणे पोलिसांनी तीन दिवसांत तब्बल 2 हजार 200 कोटी पेक्षा जास्त मेफेड्रॉन छापा टाकून जप्त केलं आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या सॅम ब्राऊन नावाच्या तस्कराच्या शोधासाठी काही पथके दिल्ली तर काही पथके मुंबईत रवाना करण्यात आली आहेत.

(हेही वाचा: Maharashtra Politics : भाजपा नेते आशिष देशमुखांचा विरोधी पक्षनेत्यांबाबत मोठा दावा, म्हणाले…)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -