घरक्राइमPune Crime : पार्किंगचा वाद महिलेच्या जीवावर बेतला; जिवंत जाळण्याचा झाला प्रयत्न

Pune Crime : पार्किंगचा वाद महिलेच्या जीवावर बेतला; जिवंत जाळण्याचा झाला प्रयत्न

Subscribe

पुणे : शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. पुण्यातील खराडी भागातून आता पार्किंगच्या वादातून महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले असून यात महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसत आहे. मात्र वेळीच महिला घरात पळून गेल्याने अनर्थ टळला आहे. (Pune Crime  Parking dispute leads to woman life An attempt was made to burn him alive)

हेही वाचा – Ashish Shelar : ” …म्हणूनच ‘वन नेशन, वन इलेक्शन’च्या प्रस्तावावर सर्व पक्षांनी सहमती दर्शवावी”, शेलारांचे आवाहन

- Advertisement -

पुण्यातील चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खराडी परिसरात पार्किंगच्या वादातून सुरुवातीला वाद झाला. त्यानंतर वाद इतका विकोपाला गेला की, 10 ते 15 जणांच्या टोळक्यांनी आधी महिलेच्या चारचाकी गाडीच्या काचा फोडल्या. त्यानंतर महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवण्याचा तिला प्रयत्न करण्यात आला. महिला घरात पळून गेल्याने ती सुदैवाने वाचली, मात्र पेट्रोल चारचाकी गाडीवर पडल्याने गाडीने पेट घेतला. ज्यात महिलेच्या चारचाकी गाडीच्या सीट जळाल्या आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महेश राजे यांनी या प्रकरणी पोलिसांत गुन्हा देखील दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार महेश राजे व सर्व आरोपी हे एकाच परिसरात राहतात. त्या दोघांमध्ये पार्किंगवरून वाद झाला. त्यानंतर 17 फेब्रुवारी रोजी त्यांच्यात वाद विकोपाला गेला आणि 13 जणांनी तक्रारदाराची गाडी फोडून नुकसान केले, तसेच त्याठिकाणी असलेली एक दुचाकी सुद्धा आरोपींनी पेटवली. याशिवाय तक्रारदार महेश राजे यांची भाडेकरू असलेली पिडीत महिला त्याठिकाणी उपस्थित होती. आरोपींनी तिच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला, मात्र महिला घरात पळून गेल्यामुळे अनर्थ टळला. या संपूर्ण प्रकरणाचा आता पोलीस तपास करत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Police & Crime : पोलीस कर्मचाऱ्यानेच केली चोरी अन् तीसुदधा स्टेशनमध्ये! कुठे घडला प्रकार?

सीसीटीव्हीत घटना कैद

सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे की, 13 जण वेगवेगळ्या दुचाकीवरून महिलेच्या गल्लीत येतात. गाड्या उभा करून ते महिलेच्या घराकडे हातात लाठ्या-काठ्या घेऊन जात असल्याचे दिसत आहे. यातील काहींनी तोंडाला रुमाल बांधल्याचे पाहायला मिळत आहे. सर्व आरोपी महिलेच्या घरासमोर उभ्या असलेल्या चारचाकी गाडीवर सुरुवातीला हल्ला करतात. त्यानंतर काहीजण लगेचच पळून जातात. याचवेळी त्यांच्यापैकी एकजण महिलेच्या दिशेने पेट्रोल फेकतो आणि हातात माचीस पेटवून ती महिलेच्या घराकडे फेकतो. यावेळी संबंधित महिला घरात पळून जाते, तिच्या गाडीला आग लागल्याचे पाहायला मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -